चिमुरात रोटरी क्लब कार्यकारणी गठित - प्रफुल्ल बेत्तावार यांची अध्यक्ष पदी निवड
चिमुरात रोटरी क्लब कार्यकारणी गठित
- प्रफुल्ल बेत्तावार यांची अध्यक्ष पदी निवड
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - प्रत्येक व्यक्ति ने सामाजिक बांधिलकी जोपासावी.कमकुवत घटकांना समाजसेवेतुन मदत व्हावी.समाजसेवा ही लोकचळवळ तयार झाली पाहीजे. निस्वार्थ सेवेने समाजाचा विकास व्हावा. समाजसेवा हिच ईश्वर सेवा.अशा प्रकारचे प्रतिपादन रोटरी क्लब असिस्टंट गवर्नर झोनचे अरुन नारायण तिखे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बोलत होते.प्रमुख पाहुणे वरोरा रोटरी क्लब चे अध्यक्ष अमित नहर, भद्रावती रोटरी क्लब चे भाविक तेलंग, पराग पत्तीवार,यांची उपस्थिती होती. रोटरी क्लब ने समाजात शैक्षणिक , सामाजिक आरोग्य,क्षेत्रात चळवळ तयार करावी हाच उद्देश समोर ठेवून चिमुर येथे रोटरी क्लब ची कार्यकारणी गठीत करण्यात आली.
रोटरी क्लब चिमुर च्या अध्यक्ष पदी प्रफुल्ल बेत्तावार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी विशाल गंपावार, सचिव पदी अतुल मेहरकुरे, कोषाध्यक्ष पदी श्रेयश लाखे, सहसचिव पदी वैभव लांडगे,कार्याध्यक्ष पदी डाँ महेश खानेकर, सेजंड अँड आर्म पदी कैलास धनोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवडू लोहकरे, तर आभार प्रदर्शन पवन ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाला विलास अल्याडवार,मंगेश हिंगनकर, आदित्य पिसे, रुपेश डोंगरवार, हरिश सारडा, मनोज मानकर, सुभाष केमये, अमित भलावे, शामजी बंग यांची प्रामुख्याने उपस्थिति होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!