शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मिळाला लाभ

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मिळाला 
लाभ 


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर: - चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजनेचा ५६ शेतकऱ्यांना लाभ मिडला आहे.
     शासकीय योजने अंतर्गत  शेतकऱ्यांसाठी तारण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत शेतकऱयांनी शेत माल आणून वखार मध्ये भरून ठेवल्या  जात असून वाढती च्या भावात माल विकल्या जाते  या वर्षी या योजनेत ५६  शेतकऱयांनी सहभाग घेतला शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाऊ नये म्हणून शेतमाल आणल्यावर त्यावेळच्या बाजारभाव प्रमाणाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम दिल्या जाते असून कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ शेतकऱ्यांनी शेतमाल करून ठेवला असता बाजार भाव वाढल्याने शेतमाल विक्री केला गेला तेव्हा ५६ शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४३७ रुपये फायदा झाला 
         चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ शेतकऱ्यांनी ३ हजार ३०१ क्विंटल शेतमाल तारण ठेवला होता तारण शेतमाल प्रति क्विंटल सरासरी ४३७ रुपये नफा झाला खर्च वजा जाता १५  लक्ष ३० हजार रुपयांचा लाभ मिळाला  असून ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली या योजनेत शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळत असल्याने  तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन समितीचे  अध्यक्ष माधव बिरजे सचिव घनश्याम ढोणे व संचालक मंडळीनी केले आहे.शेतमाल तारण योजना ही शासनाची असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून त्यांनी सहभागी होत फायदा घ्यावा. शेतमाल तारण धारक रेखा सिंगरे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!