ग्रामगीता हे सर्वसामान्य लोकांसाठी आधार - विठ्ठलरावजी सावरकर

ग्रामगीता हे सर्वसामान्य लोकांसाठी आधार 
- विठ्ठलरावजी सावरकर



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - ग्रामविश्व संघर्ष वाहिनी ची जाहीर सभा शुक्रवारी दि.२७ सप्टेंबर २०१९ ला हुतात्मा स्मारक हॉल मध्ये संपन्न झाली. सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे गहन प्रश्न सोडविण्यासाठी मदत व्हावी म्हणून ग्रामगीते ची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीते ची रचना केली. ग्रामगीता गावकरी लोकांसाठी आधार आहे. गोवंश सुधार यावर आधारित ग्रामगिते मध्ये अध्याय आहेत!  सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती कडे वळावे असे मत शेती सावरकर सर यांनी व्यक्त केले.अशोक गरीबाजी खापर्डे  नैसर्गिक शेती अभ्यासक, भिसी, गिरीधर झाडे पिंपळनेरी, विठ्ठलराव सावरकर गुरुदेव सेवा मंडळ पिंपळनेरी, रामचंद्र दिघोरे सामाजिक कार्यकर्ते भिसी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र ढोणे यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती बद्दल मार्गदर्शन केले. बापुरावजी दिघोरे, विलास मोहिणकर, अनंता कामडी , योगेश ठुने , जावेद पठाण , अमोल उर्फ गौतम कामडी , पवन कामडी , विनोद शिवरकर , रामदास ठुसे , रोहित रामटेके , इंद्रजित रामटेके आणि टीम व इतरांनी सहकार्य केले.

     शासकीय निधीतूम मंजूर झालेले १० लक्ष किमतीचे काम प्रत्यक्ष ५ लाखाचे झालेले दिसते.उरलेले पाच लाख आबू बाबू चपराशी  कर्मचारी ते ऑफिसर सचिव ते मंत्री लोकांपर्यंत वाटून खाल्ले जाते असा जनतेचा आरोप आहे.  स्वतःला मोठ्या पक्षाचे कार्यकते समजणाऱ्या नी समजून घ्यावे. जनतेला अंधारात ठेवू नये. लोकांच्याच डोक्यावर कर्ज घेऊन, लोकांच्या पैश्याची धूळधाण चालू आहे. असे मत गजेंद्र दि चाचरकर यांनी व्यक्त केले.  काँग्रेस च्या काळात ७० वर्षातले अंदाजे ८० हजार दरडोई कर्ज होते.मोदी सरकारच्या काळात अंदाजे ३० ते ३५ हजार लोन जास्तीचे घेण्यात आले. इतके सारे काम इतके सारे काम भाजपा आमदाराच्या काळात झाले जे ३५ वर्षात झाले नव्हते! असे भाजपा वाले ठासून सांगतात! त्याला कारण भाजप सरकार ने  घेतलेले ३५ हजार दरडोई कर्ज ते ही सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावर! जिथे शासकीय यंत्रणे मध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे तिथे सरकारने कर्ज घ्यायला नको होते. उद्या जाऊन बदल्यात भारतावर पारतंत्र्य येऊ शकते.  ग्रामविश्व संघर्ष वाहिनी चळवळी ची सुरवात हे गहन प्रश्नांची उकल करण्या साठी झाली. अशी पुष्टी गजेंद्र दि चाचरकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!