नवचैतन्य युवक गणेश मंडळचे नाविन्य उपक्रम
नवचैतन्य युवक गणेश मंडळचे नाविन्य उपक्रम
नवरगाव (अमोल निनावे)
नवरगाव पासून काही हाकेच्या अंतरावर देलनवाडी हे गांव आहे या गावात गणपतिचे स्थापना पासून तर शेवटच्या दिवसापर्यन्त अनेक उपक्रम घेतले जातात.तसेच या गणेश मंडळच्या वतीने सामाजिक प्रबोधनावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून दि, 27 सप्टेंबर 2019 ला विषर्जनाच्या दिवशी गाव सौंदर्यकरण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, त्या कार्यक्रमनिमित्त वृक्षारोपण करन्याकरिता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री. निशिकांत रामटेके सर, देलनवाडीचे सरपंच मा. श्रीरामजी महाजन डोंगरवार, सामाजिक युवा ब्रीगेडचे संघठनेचे प्रमुख मा. श्री अमोल निनावे सर, मा. मनोज ठाकरे सर, धनराज डोंगरवर, मा. विनोद ठाकरे सर, पोलीस मित्र चक्रधर चावरे, मंडळाचे सर्व सभासद व गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात पाहिल्यांदाच् असे उपक्रम राबविल्या गेल्या मुळे सगळीकडे या गणेश मंडळचे कौतुक होत आहे.ज्या गावातील सामान्य लोकांना मागील 10 वर्षात कधी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव माहित नव्हते अश्या गावात एखाद्या सामाजिक कार्यक्रमला उपस्थित राहून सामान्य माणसासोबत संपर्क साधून पोलीस विषयी आदराचे स्थान निर्माण करणारे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे, समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन काम करण्याची वृत्ती असणारे, कर्तव्यदक्ष, पोलीस अधिकारी म्हणून सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा, निशिकांत रामटेके सर यांचे गावात खूप कौतुक केले जात आहे, तसेच मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानले जात आहे, सर तुमच्या या कार्यामुळे गावातील युवक मंडळीत चांगले काम करण्यासाठी समोर होण्याची स्फूर्ती निर्माण होतांना दिसत आहे असे सुधा उदगार अनेक लोकांच्या मुखातून पड़ताना दिसत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!