पद्मशाली समाजामध्ये दिड दिवसाचा असतो गणपती - राजेश बैनलवार

पद्मशाली समाजामध्ये दिड दिवसाचा असतो गणपती
- राजेश बैनलवार


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - पद्मशाली समाजामध्ये दिड दिवसाचा गणपती असतो गणपती चा सण आला कि प्रत्येक मुलांमध्ये - मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण असते आपण बघतो कि प्रत्येक शहरात चौस्त्यावर तसेच प्रत्येक वॉर्डामध्ये १० दिवसाचा गणपती बसविण्यात येत असतो व दररोज बाल - गोपालांना आनंद प्राप्त होणारे कार्यक्रम गणेश मंडळा समोरील आवारात घेतल्या जातात हा कार्यक्रम बघण्यासाठी वॉर्डातील मंडळी एकत्रित येऊन बाल - गोपालांचा मनोबल व उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.कुठल्या गणपतीमध्ये ऑर्केस्टा असतो तर काही गणपती मध्ये १० हि दिवस भजन ठेवल्या जाते आणि काही गणपतींमध्ये आनंद मेळावा भरविल्या जात असते.व मुंबई सारख्या ठिकाणी लाल बागचा राजा गणपती सुप्रसिद्ध आहे मग या मंडळाची संस्था सुद्धा तयार करण्यात आली या गणपतीला जी देणगी जनतेच्या माध्यमातुन प्राप्त होत असते त्या पैशाचे समाज प्रबोधन कार्यक्रम राबविल्या जात असते तर गोर गरिबांना दान सुद्धा केले जाते.अशा प्रकारे गणपती हा सण मोठ्या आनंदाने वाज्या गाज्यात साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!