जुनी पेन्शन योजना लागू करा
सावली (सुरेश कन्नमवार)
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर(सर्व विभाग सर्व संघटना) च्या वतीने आज दिनांक 3 सप्टेंबर 2019 ला जिल्हाधिकारी साहेब जिल्हा चंद्रपूर यांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी या मुख्य मागणीसह इतरही 13 मागणीचे निवेदन देण्यात आले 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करणे दिनांक 9 सप्टेंबर 2019 ला लाक्षणिक संप करणे मागणी मंजूर न झाल्यास 11 सप्टेंबर 2019 पासून बेमुदत संपावर जाणे असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला.
सदर निवेदन देण्यासाठी अमोल खोब्रागडे समन्वयक, दुशांत निमकर समन्वयक, अमोल आखाडे महसूल विभाग, प्रशांत कोशटवार सदस्य आयटिया विभाग, विनोद पेंदोर जलसंपदा विभाग, सुधीर झाडे सदस्य राजुरा, निलेश कुमरे सदस्य सचिन चिमुरकर सदस्य, इत्यादी उपस्थित होते.दिनांक 9 सप्टेंबर 2019 ला होत असलेल्या लाक्षणिक संपाचे स्वरूप संपाच्या दिवशी तालुक्यावर कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता सरळ जिल्हा स्तरावर होणाऱ्या मोर्चात प्रत्येकांनी सहभागी होणे आवश्यक आहे सदर मोर्चा जिल्हा परिषद चंद्रपूर येथून ठीक सकाळी 11 वाजता निघणार असून गांधी चौक मार्गे ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचणार आहे त्यामुळे ठीक सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथे उपस्थित राहावे
संपात सहभागी होण्याकरिता सर्वानी आपले अर्ज लवकर आपापल्या कार्यालयात सादर करावे. कृपया किरकोळ रजा घेऊ नये .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!