शंकरपूर -डोमा जिल्हा परिषद सर्कल क्षेत्रात ३ कोटी २४ लक्ष रुपयांचे कामांचे भूमिपूजन
शंकरपूर -डोमा जिल्हा परिषद सर्कल क्षेत्रात ३ कोटी २४ लक्ष रुपयांचे कामांचे भूमिपूजन
जनतेला दिलेला शब्द केला पूर्ण आमदार किर्तीकुमार भांगडीया
शंकरपूर
चिमूर विधानसभा क्षेत्राचा कायापालट करीत असताना तालुक्यात प्रत्येक गावात दिलेला शब्द पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत असून सिमेंट रस्ते ,नाली बांधकामे व सभागृह बांधकाम साठी खनिज विकास निधीतून निधी खेचून आणून मंजूर केलेला असताना दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे प्रतिपादन शंकरपुर डोमा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत विविध गावातील विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी व्यक्त केले व या पुढील काही समस्या असल्यास त्या सुद्धा पूर्णपणे सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली .
खनिज विकास निधीतून ३कोटी २४ लक्ष रुपयांचे भूमिपूजन शंकरपूर डोमा जिल्हा परिषद क्षेत्रातील मांगलगाव येथील सिमेंट क्रांकीट रस्ताचे लोकार्पण तर कोटगाव, दाबकाहेटी ,बोडधा ,नवतळा, पिंपळगाव ,कवडशी डाक ,शंकरपूर येथील सिमेंट क्रांकीट रस्ता,श्री संत जगनाडे महाराज देवस्थान सभागृह 50 लक्ष निधी ,वल्ली दर्गा सभागृह व संरक्षण भिंत 12 लक्ष निधी ,डोमा येथील सभागृह ,डोमा मुक्ताई रस्ता मजबुतीकरण, सिमेंट क्रांकिट रस्ता ,कवडशी देशमाने येथे संताजी सभागृह, आजगाव सिमेंट रस्ता ,कोलारी येथील एकनाथ महाराज मंदिर ला सभागृह ,चिचाळा कुणबी येथे सिमेंट रस्ता व नाली ,साठगाव ,जवराबोडी वाकरला येथील भूमीपूजन करण्यात आले .
आमदार किर्तीकुमार भांगडीया पुढे म्हणाले की मागील काळात निधी मंजूर झाला नसतानाही दोन दोनदा भूमिपूजन केले परंतु मी प्रशासकीय मंजूर झाले तेव्हाच भूमिपूजन करीत आहे १६ आगस्टच्या कार्यक्रमची विरोधकांनी अपप्रचार केला त्यावर समाचार घेत विरोधकांनी तान्हा पोळ्यात भेटवस्तू ट्रे दिले ते केवळ निकृष्ट दर्जाचे दिले पाच वर्षांचा कार्यकाळ जर योग्य वाटत असेल तर पुन्हा विश्वास दर्शवावा कोणाच्याही अपप्रचारास बळी पडू नका भाऊ कधीही विसणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून केव्हाही भेदाभेद न करता गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे .
भूमिपूजन कार्यक्रमात बकारामजी मालोदे,नीलम राचलवार , राजू देवतळे, विनोद अढाळ , सचिन फरकाडे , प्रफुल कोलते ,विवेक कापसे ,मनिष नाईक , सुनील किटे, मनिष तुपलीवार ,ज्योती ठाकरे ,वर्षा शेंडे ,प्रा टिपले ,अवि बारोकर, अनिल शेंडे ,सावन गाडगे, नारायण चौधरी ,गोलू भरडकर, सचिन डाहुले, अजय शीरभैय्ये ,अमित जुमडे, किशोर नेरलावार, किशोर मुंगले ,गोलू मालोदे, आशीस झिरे ,अरबाज खान ,सैफ शेख, भाजप पदाधिकारी बुथसमिती अध्यक्ष कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!