रत्नापुर मधे पोलिसांच्या मदतीने असंख्य महिलांनी सभा बोलवुन दारुबंदीसाठी एल्गार पुकारला

रत्नापुर मधे पोलिसांच्या मदतीने असंख्य महिलांनी सभा बोलवुन दारुबंदीसाठी एल्गार पुकारला        
सिंदेवाही (वार्ताहर)            
अनेक वर्षापासून दारू बंदी झाली मात्र आजही मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपुर जिल्ह्यात सुरुच आहे.त्यासाठी अनेक गावातील महिला एकत्रित होऊन दारुबंदी साठी पुढाकार घेताना आढळून येत आहेत.                    नवरगाव मधे मोठ्या प्रमाणात दारू या एका वर्षाच्या अगोदर प्राप्त व्हायची मात्र जेव्हापासून सामाजिक युवा ब्रिगेड संघठना निर्माण झाली आणि सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे नविन ठाणेदार श्री निशिकांत रामटेके रुजू झाले तेव्हापासून अनेक अवैध धंद्यावर्ती कारवाई जोमात सुरु झाले व् तेव्हापासून नवरगाव व् इतर ठीकांचे दारुचे महापुर बंद झाले.त्यामुळे आता दारू पिणारे आंबट शौकीन आपला मोर्चा नवरगावच्या हाकेच्या अंतराव लागून असलेल्या" रत्नापुर,नैनपुर या सारख्या ठिकाणी वढ्विलेला दिसून येत  आहे.त्यामुळे रत्नापुर मधील बहुसंख्य महिला मंडळी यांनी सिंदेवाहि पोलिस व् नवरगाव चौकितील पोलिस व् रत्नापुरचे पोलिस पाटिल व् सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख अमोल निनावे यांच्या संयुक्त विराजमानने एक  महिलांची मोठी सभा रत्नापुर मधे आयोजित करुण दारू बंदी विषयावर्ती मार्गदर्शन ठेवून सगळयांच्या समश दारू बंदी महिलांची वार्ड वाहिज समिति बनवण्यात आली.या सभेचे अध्यक्ष सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री.निशिकांत रामटेके,प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक नेरकर सर,सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख श्री अमोल निनावे,तसेच रत्नापुरचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सौ कल्पना बोरकर,रत्नापुरचे पोलिस पाटिल श्री नरेंद्र गहाने,तसेच अनेक मान्यवर व् मोठ्या प्रमाणात रत्नापुरच्या महिला मंडळी उपस्थित होत्या.या सभेमधे सर्वानुमाते रत्नापुरची दारू बंद झाली पाहिजे असे अनेक महिलांच्या मुखातून उदगार निघत होते.अनेक लोकांचा संसार या दारू मुळे नस्ट् झाले,अनेक महिला बेघर झाल्या ,अनेक शाळकरी मुले शिक्षणापासून वंचित राहिले  असे अनेक समश्या आज या दारू मुळे उदभवित आहे असे मार्गदर्शन अमोल निनावे यांनी या सभेत केले.या वेळेस ठानेदार श्री रामटेके सर यांनी महिलांना दारू बंदी होण्यासाठी प्रोत्शाहित केले.व् त्यांचे मनोबल वाढवून तुम्ही केव्हापण आमच्या पोलिस स्टॉपला कॉल करा आम्ही केव्हापन तुम्हच्या पाठीशी आहोत असे म्हणून त्या महिलांना  बळ दिले.अनेक महिलांनी जेव्हापासून नविन ठानेदार श्री रामटेके सर आले आहे तेव्हापासून अवैध धंद्यावर्ति आळा घातले म्हणून आम्ही आता समोर होऊन दारू पकडू असे भाषणात आपले मनोगत वक्त केले.नविन ठानेदार आले तेव्हापासून अनेक गावात महिला व् पुरुष एकत्र होताना आढळून येत आहेत.त्यामुळे सिंदेवाहि तालुक्यात आता दारुवाल्यांचे मोठ्या प्रमाणात धाबे दनानलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!