अनोखा वाढदिवस केला साजरा

अनोखा वाढदिवस केला साजरा


नवरगाव (अमोल निनावे)                
  सामाजिक कार्यकर्ते डॉ खोब्रागड़े यांनी शाळेत तपासणी व् मोफत औषधी आणि भेटवस्तु देऊन केले स्वताच्या मुलाचा 18 वा वाढदिवस साजरा .आज 3/9/19 रोजी डॉ. श्री दीपक खोब्रागडे,डॉ सौ. रोहिणी खोब्रागडे नवरगाव यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस खांडला येथील जिल्हा परिषद् शाळेतील गरीब विधार्थिसोबत केला.डॉ.खोब्रागड़े दाम्पत्य हे सतत सामाजिक कार्यात सहभागी असतात .तसेच नवरगाव मधे निर्माण झालेली सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे खंदे समर्थक तसेच मार्गदर्शक म्हणून त्यांची ओड़ख आहे.दरवर्षी आपल्या सिद्धांत नावाच्या मुलाचा वाढदिवस लहान पनापासूनच्  गोरगरीब विधार्थ्याचे आरोग्य चेक करुण त्यांना औषधि वितरित करुण व् शिक्षणातील लागणारे गरजू वस्तु भेट देऊन  नित्यनीयमाप्रमाणे साजरे करीत असतात . नवरगावला त्यांचा एक सिद्धांत हॉस्पिटल आहे त्याद्वारे आपल्या मुलाच्या वाढदिवसा निमित्य जिल्हा परिषद शाळा खांडला येथिल  विद्यार्थ्यांचि मोफत तपासणी करून औषध वाटप केले,तसेच विद्यार्थ्याना नोटबुक,पेंसिल,कंपोस सेट,चॉकलेट्स वस्तु भेट दिल्यात,खांडला  शाळेतली शिक्षक श्री जाम्भूळे सर व सहाय्यक शिक्षक हे उपस्थित होते व् यात अनेक मुलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुण घेतली .यात  शाळेतील दोन  शिक्षकानी मदत केली.व् डॉ खोब्रागड़े यांचे खाड़ला या शाळेतील व् गावातील लोकांच्या वतीने आभार मानून वाढ दिवसानिमित्य आशीर्वाद दिला.यामुळे सिंदेवाहि तालुक्यात सगड़ी कड़े डॉ खोब्रागड़े परिवाराचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!