शिवसेनेच्या दणक्याने जि.प. शाळा खैरी येथील मंजिल शेख शिक्षकाला केले निलंबित
शिवसेनेच्या दणक्याने जि.प. शाळा खैरी येथील मंजिल शेख शिक्षकाला केले निलंबित
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभूळघाट : - चिमूर तालूक्यातील शंकरपूर जवळील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मंजिल शेख हे शाळेत मध्यपान सेवन करून येतात.विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तवनुक करतात. विद्यार्थीना अश्लील शब्दात शिवीगाळ करतात. विदयार्थींच्या पोटाला चिमटे घेणे,मारहान करीत असल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना केला. हा प्रकार मागील तीन वर्षा पासुन सुरु असुन शाळा व्यवस्थापन समिती ने तक्रार दिल्या पण वरिष्टाकडून कोणत्याही प्रकार ची दखल घेण्यात आली नाही. जो पर्यंत सदर शिक्षाकावर गुन्हा दाखल करून कारवाही व निलंबित करीत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पालक वर्ग व गावकऱ्यानी निर्णय घेतला.शिवसेनेने या प्रकरणाची माहिती मिळताच तात्काल जि. प. शाळा गाठली व संपूर्ण माहिती जाणून घेतली. व या प्रकरणाची पत्र व्यवहाराद्वारे वरीष्ठ अधिकाऱ्याना माहिती पाठविण्यात आली.
शिवसेनेद्वारे उपविभागीय अधिकाऱ्याला व संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिक्षकावर फौजदारी गुणा नोंद करून तात्काल निलंबित करण्यात यावी. अन्यथा शिवसेना आपल्या पध्दतीने धडा शिकवेल. याची तात्काल वरीष्ठानी दखल घेऊन शनिवार ला सायंकाळी सदर शिक्षक मंजिल शेख यांना निलंबित केल्याचे आदेश काढण्यात आले.आखेर पालख वर्ग,गावातील नागरीक,शाळा समिती व अध्यक्षाला न्याय मिळाला. मोलाचे सहकार्य शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख धर्मसिंह वर्मा व उपतालुका प्रमुख केवलसिंग जुनी यांच्यामुळे मिळाले यामुळे संपूर्ण खैरी येथील जनता त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!