भं. तळोधी येथे शिक्षकदिन तथा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न..

भं. तळोधी येथे शिक्षकदिन तथा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न..


सुरेश कन्नमवार
विशेष प्रतिनिधी

भं.तळोधी - 
आज दिनांक - ५/९/२०१९ ला जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा,भं.तळोधी येथे शिक्षक दिन तथा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमर  बोडलावार, माजी सदस्य, जि. प. चंद्रपूर व अध्यक्ष म्हणून  माधुरी गेडाम, सरपंच, ग्रा. पं. भं. तळोधी आणि प्रमुख अतिथी म्हणून मारोती अम्मावार, उपसरपंच, संजय गोविंदवार, अध्यक्ष, शा. व्य. स. लक्ष्मण येग्गेवार, अध्यक्ष, तं. मु.स. राकेश कटकमवार, सदस्य,ग्रा.पं. अर्चना  येग्गेवार, सदस्य, ग्रा.पं.मान. सुदर्शन कारपेनवार, माजी सरपंच, डॉ. सहदेव रेड्डी, माजी अध्यक्ष, तं. मु.स., संजय रामगोनवार, माजी अध्यक्ष, शा. व्य. समिती, रामदास येग्गेवार, रेखा कारेकर मॅडम, मुख्याध्यापिका इ.मान्यवर मंचा वर उपस्थित होते.
      दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून भं. तळोधी येथील शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्थेच्या वतीने जि. प. शाळेत कार्यरत शाळा व विद्यार्थी विकासासाठी झटणाऱ्या एका शिक्षकाला उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी मान. कु.अर्चना आनंद थोरात मॅडम यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका थोरात मॅडम यांना कार्यक्रमाचे उद्घाटक अमर बोडलावार, माजी सदस्य, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले.
या दिनाचे औचित्य साधून काही विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर पुरस्कार प्राप्त शिक्षिका  थोरात मॅडम यांनी सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कु. रोहिणी दहेगाव कर व कु. छकुली झाडे या विद्यार्थिनींनी केले. उपस्थित पाहुण्यांचे आभार अल्लीवार सर यांनी मानले.
  आजच्या शिक्षकदिनानिमित्ताने  उईके मॅडम व थोरात मॅडम यांचे मार्गदर्शनात  मीना-राजू मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेले शुभेच्छापत्र शाळेतील शिक्षकांना देऊन सर्व शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आले. तसेच शाळेत स्वयंशासन घेण्यात आले.याप्रसंगी काही विद्यार्थीनींनी साडी परिधान करून शिक्षिकेची उत्कृष्ट भूमिका साकारत विद्यार्थ्यांसमोर आपले अध्यापन कौशल्ये सादर केलीत.
आजच्या दिवसभरातील उपक्रम कारेकर मॅडम यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मडावी सर, उईके मॅडम,मान. सहारे सर, विकास झाडे सर, आकाश झाडे सर, चोखारे सर, अम्मावार सर, तानाजी अल्लीवार सर, थोरात मॅडम तसेच मीना-राजू मंच व शालेय मंत्रिमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशा प्रकारे एक अविस्मरणीय दिवस अनुभवायला मिळाला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!