सिंदेवाहीत 18 सप्टेंबरला घराचे पट्टे नगर पंचायत वाटप करणार
सिंदेवाहीत 18 सप्टेंबरला घराचे पट्टे नगर पंचायत वाटप करणार
कॉंग्रेस नगरसेवक युनूस शेख यांची माहीती
सिंदेवाही (वार्ताहर)
सिंदेवाही येथील अतिक्रमणदारांना 18 सप्टेंबर रोजी नगर पंचायत सिंदेवाहीच्या मार्फतीने पट्टे देण्यात येणार असून, पट्टे व घरकुल देण्यांची कारवाई नगर पंचायत सिंदेवाहीने पूर्णत्वास नेले असल्याची माहीती कॉंग्रेसचे नगरसेवक युनूस शेख यांनी समाज माध्यमातून दिली. याबाबत त्यांनी आमचे प्रतिनिधीशी संवाद साधतांना, त्यांना ही माहिती सभागृहात देण्यात आल्यांचे त्यांनी कबूल केले आहे.
युनूस शेख यांचे पोष्टनुसार त्यांनी सिंदेवाही येथील अतिक्रमणदारांना पट्टे व घरकुल मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, सचिवालय आणि मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. याचे फलीत म्हणून, नगर पंचायतीने पट्टे देण्यांची व घरकुले देण्यांची कारवाई पूर्ण करून, येत्या 18 तारखेला नगर पंचायत पट्टे देणार असल्यांचे शेख यांनी जाहीर केले.
या प्रश्नावर श्रमिक एल्गारने तहसिलदार सिंदेवाही यांचेकडे मोर्चा काढला होता, याचा उल्लेख करून, श्री. शेख यांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे हे पट्टे 18 तारखेला मिळणार असल्यांचे सांगून,पट्टे मिळाल्यानंतर, आपल्या मोर्चामुळे पट्टे मिळाले असा दावा पारोमिता गोस्वामी यांनी करू नये यासाठी त्यांनी आपल्या कार्याची नोंद घेण्यांचे प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे.
नगर पंचायतीचे अधिकार्रयांनी सभागृहात ही माहीती दिल्यांचे युनूस शेख यांनी सांगीतल्यांने, सिंदेवाहीतील पट्याचा प्रश्न 18 तारखेला सुटणार आहे.
युनूस शेख यांचे आभार — श्रमिक एल्गार
कॉंग्रेसचे नगरसेवक युनूस शेख यांनी सिंदेवाहीतील अतिक्रमणदारांना 18 सप्टेंबरला पट्टे मिळणार असल्यांचे जाहीर केल्यांने, श्रमिक एल्गारचे तालुका अध्यक्ष शशीकांत बतकमवार, तालुका सचिव शांताराम आदे यांनी त्यांचे आभार मानून, 18 तारखेला मोठया संख्येत अतिक्रमणदारक नगर पंचायतीत उपस्थित राहून पट्टे स्विकारतील व युनूस शेख यांचा सत्कार करतील असे जाहीर केले आहे.


नगरपंचायत पटटे देणार असे मि जाहिर केले नाही, सदर बातमी ही पक्षपाती पना निदर्शनास आणून देत आहे.. प्रथम सविस्तर प्रतिक्रिया दस्तूर खुद्द पत्रकार साहेबांनी प्रत्यक्ष माझ्या कडून जाणून घ्यायला पाहिजे होती त्याच प्रमाणे या बाबतीत माझे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते...
उत्तर द्याहटवानगरपंचायत पटटे देणार असे मि जाहिर केले नाही, सदर बातमी ही पक्षपाती पना निदर्शनास आणून देत आहे.. प्रथम सविस्तर प्रतिक्रिया दस्तूर खुद्द पत्रकार साहेबांनी प्रत्यक्ष माझ्या कडून जाणून घ्यायला पाहिजे होती त्याच प्रमाणे या बाबतीत माझे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते...
उत्तर द्याहटवा