अनेक गरीब लोक घरकुल पासून वंचित...

अनेक  गरीब लोक घरकुल पासून वंचित...   


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
 हे  दहा हजार लोकसंख्या पेक्ष्या जास्त असणारे लोकवस्तीचे गाव आहे मात्र या गावात विकासाचा आढावा घेतला तर तो फार कमी प्रमाणात दिसतो.या ठिकाणी अनेक लोकांचे घर पड़क्या अवस्थेत येऊन सुधा घरकुलच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना घरकुल मिडत नाही आहे त्यामुळे सगड्या गरीब लोकांच्या नजरा घरकुल कड़े लागले आहे.तसेच   रोड वरती खड़े पडलेले असुन पाणी साचलेले  आहे.अशातच  येथील नागरिक सुधाकर संगेल, प्रमोद केळझरकर या व्यक्तीचे अतिवॄष्टीमुळे घर उध्वस्त झाल्याने मोठा आघात झाला असून खरी मदत तर या आदिवासी व्यक्ती ला मिळायला पाहिजे, शासनाने घरकुल संदर्भात विविध योजना काढल्या आहेत त्यात  प्रधान मंत्री आवास योजना, आदिवासी समाज करिता शबरी आवास योजना,  तर ईतर समाजाकरीता रमाई योजना, इंदिरा आवास योजना या असून सुद्धा  खरा लाभार्थी आजही वंचित आहे हे या लोकांच्या घरा वरुण दिसून येत आहे.असेच अनेक लोकांचे घरे या वर्षी होणाऱ्या पावसामुळे पडले आहेत.त्यामुळे शाषणाने , लोकप्रतिनिधी आणी ग्रामपंच्यातने मोठ्या प्रमाणात या गरीब लोकांना घरकुल देण्याचे करावे.अशी मागणी शंकरपुर वाशिय लोकांकडून होत आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!