अनेक नवरगाव मधील गरीब लोक घरकुल पासून वंचित सामाजिक युवाब्रिगेड संघठनेचा अल्टीमेट

अनेक नवरगाव मधील गरीब लोक घरकुल पासून वंचित सामाजिक युवाब्रिगेड संघठनेचा अल्टीमेट 
 
नवरगाव (अमोल निनावे)
नवरगाव हे पंधरा हजार लोकसंख्या पेक्ष्या जास्त असणारे लोक आहेत.मात्र या नवरगाव मधील विकासाचा आढावा घेतला तर तो फार कमी प्रमाणात दिसतो.या ठिकाणी अनेक लोकांचे घर पड़क्या अवस्थेत येऊन सुधा घरकुलच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना घरकुल मिडत नाही आहे त्यामुळे सगड्या गरीब लोकांच्या नजरा घरकुल कड़े लागले आहे.तसेच अनेक मेन रोड वरती खड़े पडलेले दिसून येत आहे.अशातच नवरगाव येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील नामदेव दादाजी घरत, व् महादेव दादाजी घरत याआदिवासी व्यक्तीवर अतिवॄष्टीमुळे घर उध्वस्त झाल्याने मोठा आघात झाला असून खरी मदत तर या आदिवासी व्यक्ती ला मिळायला पाहिजे, शासनाने घरकुल संदर्भात विविध योजना काढल्या आहेत त्यात  प्रधान मंत्री आवास योजना, आदिवासी समाज करिता शबरी आवास योजना  परंतु खरा लाभार्थी आजही वंचित आहे हे या लोकांच्या घरा वरुण दिसून येत आहे.असेच अनेक लोकांचे घरे या वर्षी होणाऱ्या पावसामुळे पडले आहेत.त्यामुळे शाषणाने व् ग्रामपंच्यातने मोठ्या प्रमाणात या गरीब लोकांना घरकुल देण्याचे करावे.अशी मागणी नवरगाव वाशिय लोकांकडून होत आहे.तसेच या विषयी वारंवार नवरगावला अनेक वर्षापासून गरीब लोकांसाठी कार्य करणारी सामाजिक युवा ब्रिगेड संघठना समोर होऊन लवकरात लवकर या पडलेल्या लोकांना घर मिडाले नाही तर या आठ दिवसात आमरण उपोषण करू अशी माहिती त्यांच्या कडून मिडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!