अती वृष्टीमुळे घर व गोठा कोसळून सहा शेळ्या ठार

अती वृष्टीमुळे  घर व गोठा कोसळून  सहा शेळ्या ठार


शंकरपूर (जगदीश पेंदाम)

                   येथून जवळच चिचाळा (शास्त्री) येथील दौलत ज्योतिराम गजभिये यांचे काल  रात्री होणाऱ्या सततधार पावसामुळे घर व घरला लागून असलेला गोठा पडला असून त्यांच्या सहा बकर्‍या म्रुत्यू पावल्या असून दौलत गजभीये    जख्मी झाले आहेत.
                काल रात्री झालेल्या अति पावसामुळे चिचाळा शाश्त्रि येथिल दौलत गजभीये यांचे घर व घराला लागून असलेला गोठा पहाटेच्या सुमारास पडला असून त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.  ते नेहमी प्रमाणे  त्यांच्या घरी झोपले होते. त्यांची पत्नी घर व्यवस्थित  नसल्यामुळे दुसऱ्याच्या घरी झोपायला जात होती. घर पडल्यामुळे  घरामध्ये दौलत गजभीये घरात दबले होते गावातील लोकांनी लगेच विद्युत पुरवठा बंद करून  त्यांना बाहेर काढले घरात दबून असलेल्या काही जिवनउपयोगी वस्तु लोकांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र घरामध्ये असलेल्या १५ शेळ्या पैकी सहा शेळ्या वाचविण्यात यश आले नाही. तसेच  इतर काही उपयोगी साहित्य आत दबुन आहे ते काढता आले नाही
            घरी एक ते दीड एकर शेती असल्यामुळे शेळ्या पालन करून हा आपला उदरनिर्वाह करत होता शेळ्या मरण पावल्याने त्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्याना एक मुलगा असून तो सासूरवाडी ला राहत होता. दौलत गजभीये हे जख्मी असून त्यांना दवाखान्यात भरती केले आहे.  गावातील सचिन सूखदेवे, रोशन सूखदेवे, किशोर सूखदेवे, प्रमोद सूखदेवे, अंकुश सूखदेवे, संदीप सूखदेवे, कुंदा गजभे, राजू राऊत व इतर  युवकांनी त्यांना सहकार्य केले, वृत्त लिहत पर्यंत कोणाचीही आर्थिक मदत मिळाली नव्हती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!