वेगळ्या विदर्भासाठी बाजारपेठ बंद.

अहेरी (सेवा पवार) अहेरी जिल्हा आणि वेगळ्या विदर्भासाठी अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली, एटापल्ली, मूलचेरा, भामरागड, सिरोंचा येथील सर्व बाजारपेठ बंद,
संपुर्ण व्यापारी संघटनेच्या पदाधिका-याकडून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनदेण्यात आले.

अहेरी, आलापल्ली येथील व्यापारपेठ आज येथील व्यापारीनी स्वयंम स्फूर्तीने सकाळ पासूनच बाजारपेठ बंद ठेवली होती.

 एटापल्ली येथील व्यापारपेठ मागील आठ दिवसापासून बंद असून आज येथील व्यापारीनी सुद्धा त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन 37 वर्षांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही जिल्ह्यातील विकास झाला नाही, जिल्हा मागासलेला असलेला असून विकासापासून कोसो दूर आहे, अहेरी जिल्हा निर्मिती लवकरात लवकर  करण्यात यावी तसेच सध्या वीज वितरण विभागाचे अवाजवी तथा सामान्य माणसाला न परवडणारे वीज बिल ला त्रस्त होऊन आज चा बंद करण्यात आले.

 यावेळी तहसील कार्यालयात अहेरी आलापल्ली येथील व्यापारी कर्मचारी व पदाधिका-यांकडून तहसीलदयांच्या मार्फत मुख्यमंत्राना निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!