चिमूर पोलीसांचा धाडसी उपक्रम
चिमूर पोलीसांचा धाडसी उपक्रम
चिखलापार गावातील जनतेला सुरक्षित स्थळी हलविण्यात मिळाले यश
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.२६/०८/२०१९ रोजी चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत चिखलापार येथे अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याने पूर्ण गावाला वेडा घालून गावात पाणी घुसून ग्रामस्थाना धोका निर्माण झाल्याची वार्ता पसरल्याने ग्रामस्थांचा जिव वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याची माहिती चिमुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांना कळल्यावर त्यांनी आपले सहकारी पोलिस पो.उप नि राजू गायकवाड, किरण मेश्राम, पोहवा विलास निमगडे, नापोशि किशोर बोढे, पोशी विनायक सरकुंडे, कुनाल राठोड,सचिन साठे,रवी आठवले, मपोशी उज्वला परचाके यांना सोबत घेऊन चिखलापार येथील ग्रामस्थांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ WCL ची रेस्क्यू पथक चिमूर तालुक्यातील चिखलापार या ठिकाणी पाठवून जनतेला सुखरूप चिमूर शहरातील शेतकरी भवन येथे हलविले हा ऑपरेशन रात्रौचे १० वाजेपर्यंत सुरू होता यानंतर त्या समस्त ग्रामवासीय जनतेला भारतीय जनता पार्टी चिमूर तर्फे जेवनाची तथा राहण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली यावेळी आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया तसेच वसंता वरजूकर , निलम राचलवार,सचिन फरकाडे,राजू दांडेकर,हरिष पिसे ,विक्की कोरेकार ,तसेच चिमूर तहसील चे कर्मचारी व आदिंची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!