अभविप ने रक्षाबंधन निमित्य केले सुंदर उपक्रम

अभविप ने रक्षाबंधन निमित्य केले सुंदर उपक्रम


वरोरा - प्रतिनिधी (आलेख रट्ठे)


वरोरा : - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा -वरोरा तर्फ आनंद मूक बधिर व अंध विद्यालय आनंदवन तथा वरोरा पोलीस स्टेशन वरोरा येथे रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभाविपच्या सदस्यांनी आनंद मूक बधिर व अंध विद्यालय आनंदवन वरोरा येथे जाऊन लहान मुलांना चॉकलेट व मिठाई देऊन, ओवाळून त्यांना राख्या बांधल्या व त्यांच्याशी हीतगुज साधून त्यांच्याशी आपुलकीची भावना व्यक्त केली. व रक्षाबंधन सन साजरा केला. तसेच स्थानिक वरोरा पोलीस स्टेशन येथे जाऊन दिवस रात्र आपल्याला संरक्षण देणाऱ्या पोलीस बांधवाना राखी बांधून व मिठाई वाटून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी अभाविपच्या विद्यार्थ्यींनींना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विशेषतः विद्यार्थिनी यांचेशी संवाद साधत ते म्हणाले की आपल्या कोणत्याही प्रकारची कोणी छेड करत असेल किंवा कोणी त्रास देत असेल तर वरोरा पोलीस स्टेशनला कळवावे. तसेच वरोरा शहराच्या प्रत्येक महाविद्यालयात पोलीस तक्रार निवारण पेटी पोलीस विभागा तर्फे लावण्यात आली आहे . त्या मध्ये आपली तक्रार आपण लिहून टाकावी व सोबत आपले मोबाईल नंबर टाकावे. या तक्रारीचे निवारण 2 दिवसांत करण्यात येईल अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अभाविप वरोरा शाखे तर्फे रक्षाबंधन निमित्त पोलीस स्टेशनला स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. या कार्यक्रमाचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गणेश नक्षिणे, शकील शेख, अंकित ढोबळे, कौशिक घोरपडे, वंश जयस्वाल, विनीत आत्राम ,आशिष भट, समीक्षा इंगळे, संघर्षा नरड, तनया मून, दिव्या वाणी, अक्षता माहुरे, कीर्ती वाणी, आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!