१६ ऑगस्ट शहीद स्मूर्ती दिनी आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी रक्षा बंधन व महिलांना मिक्सर वाटप करण्याचा निर्णय घेतला असतांना मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव वाढल्याने या कार्यक्रमात चेंगरा - चेंगरीत अनेक महिला पडल्या बेशुद्ध
१६ ऑगस्ट शहीद स्मूर्ती दिनी आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी रक्षा बंधन व महिलांना मिक्सर वाटप करण्याचा निर्णय घेतला असतांना मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव वाढल्याने या कार्यक्रमात चेंगरा - चेंगरीत अनेक महिला पडल्या बेशुद्ध
उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांच्या नातेवहिकांना तसेच जनतेला भाजप कार्यकत्यानी दिल्या शिव्या
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - चिमूर १६ ऑगस्ट शहीद स्मूर्ती दिनी आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी रक्षा बंधन व महिलांना मिक्सर वाटप करण्याचा निर्णय घेतला असतांना मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव वाढल्याने या कार्यक्रमात चेंगरा - चेंगरी झाली.या चेंगरा चेंगरी मध्ये विस ते पंचीस महिला चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या आहेत याची माहिती काँग्रेस चे विधानसभा कार्याध्यक्ष गौतम पाटील व शिवसेना तालुका अध्यक्ष विलास डांगे यांना माहिती मिळताच तात्काळ उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल झाले व महिलांना धिर देत त्यांच्यावर योग्य त्या प्रकारे उपचार करण्यात यावा व या कार्यक्रमात झालेली चेंगरा - चेंगरी व हा कार्यक्रम घडवून आणणारे आमदार व यात महिला दगावण्याची शक्यता टाळता येत नसून जर यात कोणी महिला दगावल्यास आमदार जवाबदार राहील असाही यावेळी आरोप शिवसेना तालुका अध्यक्ष विलास डांगे यांच्याकडून करण्यात आला.या चेंगरा चेंगरीत २० महिलांची चिंताजनक स्थिती झाल्याने त्यांच्यावर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे व काही महीलांना सुट्टी देण्यात आली.काही कार्यकाते रूग्णालयात येऊन आमच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची घटणा घडली नाही, महीला मृत्यु झाली म्हणून बदणामी करीत आहात म्हणून जनतेला अश्लिल शिव्या देण्यात आले.या बिजेपी च्या कार्यकर्त्यांनी जनतेला शिव्या देण्याचा कोनता अधिकार आहे,अशी चिमुर च्या जनतेत कडून बोलले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!