चिमुर शहरात ठिकठिकाणी झेंडावंदन कार्यक्रम सम्पन्न
चिमुर शहरात ठिकठिकाणी झेंडावंदन कार्यक्रम सम्पन्न
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर :- आज ७२ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न. चिमुर शहरातील डोंगरावर चौक,नेहरू चौक , अभ्यंकर मैदान, उपविभागीय कार्यालय या सर्व ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले.
उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ९ वाजून ५ मिनिटांनी उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांच्या हस्ते झेंडावनदन करण्यात आले,प्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, पंचायत समिती सदस्यां भावणताई बावनकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष योगेश ठुने, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, आदी उपस्थित होते,तसेच ९ वाजून ४० मिनिटाने अभ्यंकर मैदान येथे जिल्हा परिषद सदस्य डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके तालुका कांग्रेस अध्येक्ष माधव बिरजे, युवक काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्ष गौतम पाटील , युवक तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले,विधानसभा कार्याध्येक्ष मंगेश घ्यार, नगराध्येक्ष गोपाल झाडे, नगरसेवक विनोद ढाकुनकर,नगरसेवक उमेश हिंगे, न्यू राष्टीय विद्यालयचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!