धनराज मुंगले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे चिमुरात उदघाटन

धनराज मुंगले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे चिमुरात उदघाटन



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमुर : - भारतीय जनता पार्टीचे चिमूर तालुका माजी अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा क्षेत्रात जननायक म्हणून ख्यातिप्राप्त धनराज मुंगले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले.
         शाहिद स्मृती दिनाचे औचित्य साधून आज दिनांक १६ ऑगस्ट रोज शुक्रवारी झालेल्या उदघाटन सोहळा भाजपा नेते कमलाकर लोणकर यांचे हस्ते करण्यात आले.
         प्रस्तुत प्रतिनिधिशी बोलतांना धनराज मुंगले म्हणाले,चिमूर येथील जमसंपर्क कार्यालय हे सामाजिक न्यायाचे मंदिर अशी आशा आहे, ८५ टक्के बहुजन समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल, वंचित घटकांना न्याय देने आमचे कर्तव्य समजून या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
        या कार्यक्रमाप्रसंगी कमलाकर लोणकर, यशवंत वाघे,राजेश मुंगले,सूर्यभान ननावरे, साप्ताहिक पुरोगामी संदेश चे संपादक सुरेश डांगे, मनोहर धापटे, नथु गराटे, सुधाकर भलमे, मनोज हजारे, अविनाश रासेकर, शंकर माहुरे, रमेश दडमल, शुभम भोपे, नरेंद्र नगराळे, सेवक रामटेके आदी मानीवर उपस्थित होते.
         या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते कमलाकर लोणकर म्हणाले की भाजपच्या जळणघडणीत मेहनत घेतली त्यांना संधी देण्यात यावी या आशयाने आम्ही धनराज मुंगले यांच्या सोबत आहोत, आगामी विधानसभा निवडणुकीकरीता त्यांना भाजपाची उमेदवारी मिळेल अशी आशा आहे.
        धनराज मुंगले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन प्रसंगी हजारो महिलांची उपस्थिती लक्षवेधक होती, पुरुष कार्यकर्त्यांपेक्षा महिलांची बहुसंख्य उपस्थिती भविष्यातील राजकीय समीकरण बदलविण्यास कारणीभूत ठरू शकते असे विश्लेषण राजकीय क्षेत्रातील जाणत्या व जागृत नेत्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!