श्रीगुरूदेव सेवा महिला मंडळातर्फे सामुहिक रक्षाबंधन

श्रीगुरूदेव सेवा महिला मंडळातर्फे सामुहिक रक्षाबंधन 

देश बलशाली व्हावा हे राष्ट्रसंताचे स्वप्न - आ. नानाजी शामकुळे


चंद्रपूर (प्रतिनिधी )- आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य या देशातील तमाम जनतेच्या त्यागातून , इंग्रजांसोबत केलेल्या अथक  संघर्षामुळे प्राप्त झाले आहे . १९४२ च्या आॕगष्ट क्रांती आंदोलनात  राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले होते .आता मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी  समाजात सदभाव , समता , बंधुता प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रत्येकांची आहे. देश बलवान व्हावा , सुखी समृद्ध व्हावा हे राष्ट्रसंताचे स्वप्न होते . त्यांच्या स्वप्नपुर्ततेकरीता त्यांनी दिलेले विचार घराघरापर्यंत पोहचवा , असे प्रतिपादन चंद्रपूरचे आ. नानाभाऊ शामकुळे यांनी केले. तुकूम स्थित श्रीगुरूदेव  सेवा महिला मंडळ शिवाजी नगर शाखेच्या   वतीने हनुमान मंदिर परिसरात  सामुदायिक रक्षाबंधन आणि जनप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,  त्याप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते .


    कार्यक्रमाचे  उद्घाटन राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक 
    ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले. 
     प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरच्या महापौर सौ. अंजलीताई  घोटेकर, नगरसेवक  सुभाष कासनगोट्टूवार,नगरसेविका सौ. पुष्पा उराडे ,  सेवामंडळाचे तालुकाप्रमुख  विजय चिताडे, ग्रामगीता परीक्षा विभागाचे शहर प्रमुख कीर्तनकार   आण्याजी ढवस, ‌सौ.अनुराधा हजारे ,   सौ.वृंदा हुलके ,  दादाजी नंदनवार , सौ.आशाताई बुरडकर ,  सौ. कल्पना गिरडकर , श्रीमती नंदा जोशी ,  प्रमोद शास्रकार आदी मान्यवरांची उपस्थिती  होती .  
 प्रास्तविक संयोजिका सौ.
  कल्पना  गिरडकर यांनी केले तर मंडळाचे  प्रचार कार्य कसे करावे याबाबत विजय चिताडे यांनी विचार व्यक्त केले. महापौर सौ.घोटेकर यांनी महिला मंडळाच्या ह्या उपक्रमाचे कौतुक करून महिलांनी बुवाबाजी करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सुभाष कासनगोट्टूवार यांनी तुकूम प्रभागात महिलांनी केलेले सामुदायिक कार्य प्रेरणादायी असल्याचे म्हटले . कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर यांनी रक्षाबंधन आणि श्रीगुरूदेव सेवा मंडळ यांचेतील  तत्त्वविचार सांगत राष्ट्रसंताच्या विचारांनी नवी पिढी उन्नत व्हावी , उद्योगशील  व्हावी याकरिता अध्यात्मसंस्कार सोबतच  विज्ञानवादी संस्कार रूजविण्यावर भर देण्याबाबत लक्ष वेधले. संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.  जनप्रबोधनानंतर सामुदायिक , रक्षाबंधन करण्यात आले. स्थानिक अडीअडचणीवर आ.शामकुळे यांनी स्थानिक मंडळीशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान देवस्थान समितीचे सदस्यगण तसेच महिला मंडळाचे   उषाताई मेश्राम, कलावती गुहे,बेबी चौके,मंदाताई थेरे शालीनी वाढई , राधा आवारी,बयाबाई निकोडे, कुंदा गिरकर, सुरेखा देवतऴे, अनुसया खनके,कुमुद खनके, चंदा इटनकर, रामटेके, पांडे, नंदा चौधरी, निशाताई जाधव, प्रभा मेश्राम, प्रणिती गिरडकर, सुजाता गायकवाड़, सुलोचना बोरीकर, दिलीप बोरीकर, राजू भोस्कर, राजू कावळे, बाटवे गुरूजी, सतिश गिरडकर, रुपेश जुमडे मिरा निकोडे, कौशल्या जांगळे,सुरेश कावळे, श्री. मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन  उषाताई मेश्राम यानी केले तर  आण्याजी ढवस यांनी सर्वांचे  आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!