चिमूर येथे ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन

चिमूर येथे ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - ओबीसींच्या विविध समस्यांसंदर्भात राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण यांच्या सहकार्यातून ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण बिगर शेतकी पतसंस्थेच्या सभागृहात १८ अॉगष्टला करण्यात आले आहे. या हक्क परिषदेचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी असून या परिषदेचे निमंत्रक वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड.भूपेशकुमार पाटील आहेत.५२% असूनही ओबीसी हक्क व न्यायाच्या बाबतीत कुठे आहेत? या विषयासंदर्भात ही हक्क परिषद होत असून बहुसंख्येने या परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंयोजक रामदास कामडी,रविंद्र उरकुडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!