संगणक परिचालक बेमुदत काम बंद आंदोलनावर?

संगणक परीचालकांचे  बेमुदत काम बंद आंदोलन.

 संगणक कार्य प्रभावित होणार!
 मुल (प्रकाश चलाख)

 राज्यातील 27 हजार 906 ग्रामपंचायत मधील सर्व संगणक परिचालक आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक 19 /8 /2019 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याने राज्यातील अनेक ग्रामपंचायती मधील संगणक कार्य प्रभावित  होणार आहे.

  महाराष्ट्र राज्यात 2011 पासून प्रत्येक गावात ग्राम विकास व माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत संग्राम आता आपले सरकार या विभागांतर्गत सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून अनेक बेरोजगार युवक काम करीत आहेत. परिचालक ग्रामपंचायत मधील रहिवाशी दाखला, बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल, जमा खर्च नोंद, ग्रामसभा ,घरकुल, कर्जमाफी  शेतकऱ्यांचा पिक विमा, गाव विकास आराखडा ,ऑनलाइन का म,आणि ग्रामपंचायत सांगेल ते काम इत्यादी विविध प्रकारची 29 प्रकारचे कार्य ग्रामस्तरावर संगणक परिचालक सहा हजार रुपये कार्य करीत आहेत.

 या संगणक परिचालकांना अजून पर्यंत ही शासनाने कायम केलेले नाही. त्यामुळे संगणक परिचालक यांनी आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात इसवी सन 2011 पासून शासनासोबत कायम करण्यात यावे याकरिता अनेक निवेदने दिली आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेकदा चर्चा सुद्धा केलेले आहेत. संघटनेअंतर्गत अंतर्गत दिनांक 30/ 11/ 18 ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आयटी महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन लेखी दिले होते तू त्यांनी अजून पर्यंत हे लेखी आश्वासन पाळले नाही.

 मागील आठ वर्षापासून हजारो संगणक परिचालक  ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इथे कार्य करीत आहेत .चौदाव्या वित्त आयोगाचा निधी सीएससीएस पीसी व तिच्या  उपकंपन्या यांना देत असल्यामुळे आपले सरकार प्रकल्पाला ग्रामपंचायत देण्यास विरोध करीत आहे.

 ग्रामीण भागातील सहा कोटी जनतेचे कार्य गेल्या आठ वर्षापासून संगणक परिचालक करीत असून एकेक वर्ष त्यांना बिना वेतनावर कार्य करावे लागत आहे .शासन बोगस कंपन्यांचे नियुक्ती करीत असून त्या माध्यमातून संगणक परिचालक  कार्य करणाऱ्या अनेक बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे.

 माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन गेल्या चार वर्षापासून पाडले नसून त्यांचे आश्वासन फेल ठरले आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2018 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कायम करू असे आश्वासन दिले होते परंतु त्यांनी अजून पर्यंत ही संगणक परिचालकांना पदावर  कायम केले नाही.

 करिता राज्यातील सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सतरा वरील कार्य करणारे संगणक परिचालक आयटी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून नियुक्ती देणे, मानधन राज्य शासनाच्या निधीतून प्रति महिना पंधरा हजार रुपये देणे ,एप्रिल 2017 ते जुलै 2019 चे थकीत वेतन देणे, शासनातर्फे विविध योजनेचे मानधन देणे, कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेणे इत्यादी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संगणक परिचालक बेमुदत काम बंद आंदोलन असल्याने राज्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद येथील संगणक कार्य प्रभावित होणार आहे.

"30 नोव्हेंबर2018 च्या लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी ,संघटनेचे मागण्या विना विलंब मान्य करण्यात यावे संगणक परिचालक यावर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा यासाठी तालुक्यातील 34 संगणक परिचालक बेमुदत आंदोलनात सहभागी होत आहेत."

हेमंत भुरसे, संगणक परिचालक

माजी अध्यक्ष, तालुका संगणक परिचालक मुल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!