संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती होणार ऑफलाईन -19 आगस्ट पासून संगणक परीचालक बेमुदत संपावर

संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती होणार ऑफलाईन -19 आगस्ट पासून संगणक परीचालक बेमुदत संपावर


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती 19 आगष्ट पासून ऑफलाईन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटनेच्या वतीने विदर्भ अध्यक्ष देवेंद्र गेडाम यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासणा
नुसार ग्रामपंचायत संगणक परिचालक याना आय. टी. विभागात  सामावून घेण्यासह विविध मागण्यांसाठी हे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून आपले सरकार सेवा केंद्रात प्रामाणिक पणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परीचालकांना शासनाच्या वतीने वेळोवेळी केवळ आश्वासनाची गाजर देण्यात आली परंतु ती पूर्ण करण्यात आलेली नाही.याच संगणक परीचालक यांचे परिश्रमावर राज्य शासनाला केंद्र शासनाकडून सलग 3 वेला प्रथम क्रमांकाचा तर एक वेळा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
 संगणक परीचालकांना रात्र दिवस काम करायला लावून त्यांचे कडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना,प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्व्हे,प्रधानमंत्री अस्मिता योजना,प्रधानमंत्री श्रमयोगी योजना,निवासी वापरासाठी केलेले अतिक्रमण नियमकुल करण्यासाठी सर्व्हे,प्रधानमंत्री जन आरोग्य-आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री यांची व्ही. सी. असो की मन की बात सगळ अगदी डेडलाईन देऊन पूर्ण केली जाते मग त्या संगणक परीचालक यांचा मानधनाच्या आणि न्यायोचित मागण्या पूर्ण करण्याच्या वेळी शासनाची बुद्धी कुठं जाते असा प्रश्न संगणक परीचालक विचारत आहेत.
अविरतपणे ग्रामीण नागरिकांची सेवा करत असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संगणक परीचालकांची मानधनाच्या नावावर केली जाणारी बोळवण 6-12 महिने भेटत नाही,भविष्यात कसलीही सुरक्षित ता नाही या अशा परिस्थितीत संगणक परीचालक पुरता नैराश्याचे खाईत ढकलल्या जात आहे,संगणक परिचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेड येत असून कुठल्याही राजकीय नेत्यांना किव्वा पक्षाला त्याचे काहीही सुतक नाही, अगदी 10 वि पास  शासनाच्या चपराशी पेक्षा या पदवीधर, तसेच संगणकाचे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल शासनाने करून ठेवल्याचे विदारक परिस्थिती आहे.३०नोव्हेंबर२०१८ ला मुंबई येथील आंदोनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी 10 दिवसात बैठक घेऊन संगणक परीचालक याना आय.टी. विभागात घेण्यात येईल असं आश्वासन दिले होते मात्र 8 महिन्यानंतर ही मुख्यमंत्र्यांनी आपलं आश्वासन न पाडल्यामुळे राज्यातील सुमारे 28000 ग्रामपंचायती,351 पंचायत समिती, व 34 जिल्हापरिषद मध्ये कार्यरत सुमारे 22500 संगणक परीचालक बेमुदत संपावर जात आहेत.
-प्रमुख मागन्या-
1) राज्यातील सर्व संगणक परीचालक यांना आय.टी. विभागात सामावून घेणे.
2)संगणक परीचालकांची थकीत मानधन तात्काळ अदा करणे.
3)अतिरिक्त कामाचा मोबदला त्वरित देने.
4) ज्या ग्रामपंचायत ने हेतुपुरस्सर rtgs केले नाही त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांचेवर कार्यवाही करणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!