नवरगावात वृक्षारोपण
सामाजिक युवा ब्रिगेड संघठना, मारिया कंप्यूटर इंस्टिट्यूट, पशुवैदकीय अधिकारी व् पोलिस चौकी,व्यापारी यूनियन संघठना यांच्या सौजन्याने नवरगाव मधे झाडे लावा मोहीम आयोजित करण्यात आली
नवरगाव (अमोल निनावे)
वृक्ष वली आम्हा सोयरे दिनचरेया म्हणी प्रमाणे व् 33 कोटि वृक्ष लागवडीचे आयोजन सरकारणी केलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 18/8/2019 ला सामाजिक लेवल वरती अनेक संघठना यां एकत्रित होऊन मोठ्या प्रमाणात नवरगावला झाडे लावा मोहीम राबविण्यात आली.या संघठने मधे सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे सर्व कार्यकर्ते ,व्यापारी यूनियन चे लोक,पोलिस चौकीचे अधिकारी व् पशुवधकीय अधिकारी,मारिया कंप्यूटरचे मुले,अमूल्य ट्यूशन क्लासेस चे मुले अश्या अनेक संघठना व् संस्था या मोहिमेत सहभागी झाले होते.
या मोहिमेची सुरुवात माता चौक नवरगाव इथून झाली तर बाजार चौक आठवडी बाजार मधे झाडे लावण्यात आली.यात प्रामुख्याने .डॉ.सौ .रोहिणी दिपक खोब्रागड़े मैडम यांच्या हस्ते झाड लावून कठडा सभोवताल लावण्यात आले.पशुवैदकीय अधिकारी डॉ .श्री पराग खोब्रागड़े साहेब तसेच सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री निशिकांत रामटेके चौकीचे पोलिस उप निरीक्षक श्री पाटिल सर ,नेरकर सर व् आवारे सर ,पोलिस हवालदार बावने सर व् अविनाश शेंडे यांच्या हस्ते झाडे लावण्यात आले.सोबतच मारिया इंस्टिट्यूटचे संस्थापक श्री विजय लोणारे सर यांच्या हस्ते झाडे लावण्यात आले.तसेच युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख अमोल निनावे,अशोक निमगळे ,मंगेश बेले,काउलकर सर,प्रा.डॉ इंदुरकर सर ,लंकेश बोकडे,सुधीर भशेशंकर,प्रणय गायकवाड़ असे अनेक संघठनाच्या युवानी झाडे लावली.अमूल्य ट्यूशन क्लासेस चे विध्यर्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता .या मोहिमेची सुरुवात बैंड पथक व् रॅली काढून करण्यात आली व् गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!