आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दिलेला शब्द केला पूर्ण बहिणींना मिळाला घरपोच मिक्सर

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दिलेला शब्द केला पूर्ण बहिणींना मिळाला घरपोच मिक्सर

चिमूर विधानसभा क्षेत्रातील ३० गावातुन  मिक्सर वाटपाला सुरवात

विरोधकांच्या आरोपाला जोरदार चपराक


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
  
            चिमूर विधानसभा क्षेत्रात २० टक्के राजकारण तर ८० टक्के समाजकारण करण्याचे काम मागील सात वर्षांपासून करीत असून दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम घेत असताना मात्र यंदा चे वर्षी १५ आगस्ट ला रक्षाबंधन कार्यक्रम आल्याने १६ आगस्टला शहिदाना नमन करण्यासाठीच्या शहीद स्मृती दिन सोहळा हा योगायोग या कार्यक्रमाचे   निमित्ताने संयुक्त  कार्यक्रम ठेवला होता तेव्हा 60 हजार बहिणी उपस्थित झाल्या होत्या कार्यक्रम पूर्ण व्हायच्या आधीच चिमूर व संपूर्ण जिल्ह्यात विरोधकांनी अपप्रचार सुरू केला होता ५-१०  महिला दगावल्याचा खोटा अपप्रचार केला कार्यक्रम स्थळी साप आणून सोडण्याचा कुटील डाव विरोधकांनी केला. परंतु मातृ शक्तीच्या आशीर्वादाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही . माझ्या बहिणीवर प्रेम विश्वास असल्याने त्यातच समाधानी आहे प्रेम व विश्वास शेवटच्या श्वासा पर्यत टिकवून ठेवण्याचे काम करायचा आहे .मातृशक्ती पितृ शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक गावात जाणार असल्याचे सांगत खोट्या प्रचारास बळी पडू नका असे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील सातारा गावातील भगिनींना प्रत्यक्षात आपले हाताने म मिक्सर  देत तीस गावात मिक्सर वाटप सुरू केले असल्याचे सांगितले . 
              सातारा येथील रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते यावेळी  डॉ श्यामजी हटवादे,  प्रकाश वाकडे ,समीर राचलवार , ओमभाऊ गणोरकर ,प्रवीण गणोरकर, सरपंच सुरेखा कोयचाडे ,नगरपरिषद सभापती सतीश जाधव, ,सुरज नरुले  ,हरीश पिसे, संजय नवघडे, संजय कुंभारे ,प्रशांत चिडे,  कलिम शेख, अंकुश डाहुले,आदी उपस्थित होते.
 16 आगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा ,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित कार्यक्रमात अफाट महिलांची गर्दी पाहता  काही अपरिहार्य घटना होऊ नये तसेच बाहेरच्या मतदार संघातील महिला उपस्थित झाल्या  होत्या त्यामुळे आलेल्या बहिणी ना अडचण निर्माण होऊ नये यासाठी घरपोच भेट वस्तू देण्याचे जाहीर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केला होता तेव्हा दिलेला शब्द पाळत त्यांनी बहिणींना घरपोच मिक्सर भेट वस्तू दिल्या प्रास्ताविक गजानन गुळध्ये तर संचालन विवेक कापसे यांनी केले . 
चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड ,चिमूर तालुक्यातील जवळपास तीस गावात भगिनींना घरपोच मिक्सर देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केले असल्याची माहिती आमदार भांगडीया यांनी दिली असून त्यात सातारा,बामणगाव, वाघेडा, बेलारा ,सावरला,जामगाव, डॉगरला ,नदारा, आमडी बे ,चिंधीचक, हुमा,खडकी,कांपा, सह शेतमजूर भगिनी शेतातून घरी आल्यावरही रात्री उशिरापर्यंत वाटप सुरु असल्याची माहिती यावेळी भाजपच्या पदाधिकारी यांनी दिली .  पहिल्या भेटवस्तू सत्रात मासळ  जीप क्षेत्रात बहिणींना भेट वस्तू पोहचवून देण्यासाठी हरीश पिसे पराग अंबादे आशिष झिरे गजेंद्र राऊत सचिन डाहूले निखिल भुते भूषण सातपुते  सैफ  शेख  अरबाज खान सौरभ बडगे अतिष गौरकर प्रणित सातपुते तुषार तालेवार आशीस मिसार यांनी विशेष परिश्रम घेतले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!