शाळेच्या भौतिक सुविधे करीता दिली आर्थिक मदत
शाळेच्या भौतिक सुविधे करीता दिली आर्थिक मदत
राजू आत्राम भाजपा बुथ सचिव तथा सामाजिक कार्यकर्ता पळसगांव
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील ताडोबा उद्याना लगत बफर झोनमध्ये वसलेल्या मौजा पळसगावं (पि) येथील भाजपा बूथ सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते शाळेचे माजी विद्यार्थी राजू आत्राम यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,पळसगांव ला दिनांक १५ आगस्ट२०१९ ला ७३ व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने स्व कमाईतून स्वतः च्या हस्ते आर्थिक मदत दिली असून रुपयांची मदत प्रदान केली. या रकमेतून शाळेसाठी भौतिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक फुलझेले सर यांनी आपल्या प्रास्तविकतून वेक्त केले.
राजू आत्राम यांनी गावच्या युवकांना मदतीचा हात दिला आहे. क्रीडा स्पर्धांसह सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्या कार्यक्रम आत्राम हे हिरिरीने भाग घेतात . सदर कार्यक्रमास शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष हाफिज शेख,सरपंच गीता शेंडे,ज्ञानेश्वर ढोक उपसरपंच,संजय गावतुरे,प्रभाकर गजभिये,इको अद्यक्ष,वसंता बन्सोड तंटा मुक्ती अद्यक्ष,चुनरकर सर,बोरकर सर,विनायक ठाकरे, रोशन बन्सोड, बालाजी बन्सोड, पुरुशूटम कुंभरे शाळा समिती सदस्य ग्राम पंचायत सदस्य,यांच्या उपस्थिती मध्ये शाळेचे मुख्यद्यपक फुलझेले सर यांच्याकडे सुपूर्द केला. शाळेच्या ७३ व्या स्वातंत्र दीना निमित्य केलेली ही मदत मोलाची ठरली आहे.
राजू आत्राम यांनी माजी विद्यार्थी असून मला शाळेविषयी अभिमान वाटतो. त्यामुळे ही आर्थिक मदत केली आहे. शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी मदत देणार आहे.देण्याचा मानस असून ती मदत मी नक्की करणार आहे,असे राजू आत्राम यांनी वेक्त केले सदर कार्यक्रमास शिवानी शाळा शिक्षक तथा विद्यार्थी, आश्रम शाळा शिक्षक तथा विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला असून या कार्यक्रमा संचालन धारणे सर यांनी केले व आभार प्रदर्शन जांभूळकर सर यांनी केले खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!