चिमुर तालुक्यातील शेतकरी सापडायला दुहेरी संकटात

चिमुर तालुक्यातील शेतकरी सापडायला दुहेरी संकटात 

- विजय डाबरे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चिमूर

- संजय घुटके संघटक सचिव काँग्रेस कमिटी चिमूर



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - चिमूर तालुक्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. 
त्यामुळे तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावे लागत आहे. तसेच या पावसाचा भात पिकांच्या पऱ्यांना फटका बसलेला आहे. आधी निसर्गाने पंधरा ते वीस दिवस कडक उन्ह पडून भाताचे पऱ्हे वाळले त्यामुळे भात पिकाची विस ते पंचवीस टक्के  नुकसान झाली.  आणि आता अतिवृष्टीमुळे परीसरातील नवतळा, मदनागड, डोंगरगाव बंजी आणि चिमूर तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे.  जर परत एकदा अतिवृष्टी झाली तर शेत पडीक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
         अतिवृष्टीमुळे भात पिकाचे पऱ्हे सडलेले असल्याने शेत पडीक राहते की काय अशी शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने महसूल विभागाला आदेश देवून पिकांची पाहणी करून चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी. अशी मागणी विजय डाबरे उपाध्यक्ष तालूका कांग्रेस कमेटी चिमूर संजय घुटके संघटक सचिव तालूका कांग्रेस कमेटी चिमूर  यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!