कामगारांच्या सुरक्षा किट वाटपात नगरसेवकांचा बेकायदा हस्तक्षेप लावलेले आरोप बिनबुडाचे
कामगारांच्या सुरक्षा किट वाटपात नगरसेवकांचा बेकायदा हस्तक्षेप लावलेले आरोप बिनबुडाचे
- नितीन कटारे ( बांधकाम सभापती )
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - शासनाने इमारत, लाकूड,बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप योजना अंमलात आणून अमलबजावणी केली असल्याने मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्यासाठी धावपळ करीत असून चिमूर शहरातील कामगार वर्ग आपली नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात नगर परिषद मध्ये जात असतात परंतु तथाकथित काही नगरसेवक हे कामगारांचे विहित नमुन्यातील अर्ज स्वतः हस्तक्षेप करून ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप काही समाज सुधारक यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केला असून हे आरोप बिनबुडाचे आहे असे बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी म्हटले असून काही महिला नगर सेविकांचे समाज सुधारक पती हे आपल्या पत्नींना जनतेची कामे करण्यास बाहेर येत नाहीत व याची मुख्याधिकारी यांनी दखल घ्यावी.
राज्य शासनाने कामगार वर्गाचे उन्नती साठी योजना अंमलात आणून त्यांना सुरक्षासाठी सुरक्षा किट वाटप सुरू केली असून चिमूर नगर परिषद अंतर्गत कामगार यांचे शेकडो अर्ज मागील तीन ते चार महिन्यांपासून दिलेले असतांना कुठल्याही प्रकारे नागरिकांना हेलपाटे खावे लागत नसून हि संपूर्ण आरोप चुकिची आहे.परंतु काही नगर सेविकांचे पती हे आरोप करीत आहे कि नगर सेवक स्वतः हस्तक्षेप करून अर्ज कामगारांचे अर्ज आपल्या घरी घेऊन जातात असे वृत्तपत्राद्वारे छापून नगर सेवक यांची परस्पर बदनामी करीत आहे.असला काहिही प्रकार घडलेला नसून जनता स्वतः लोक प्रतिनिधी यांच्या कडे मदत मागत असेल आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत केली ते चुकीचे असेल तर असल्या चूका नेहमी करणार असेही यावेळी नगर सेवक तथा बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी पब्लिक पंचनामा या वृत्तपत्राद्वारे बोलल्या गेले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!