आमदारांनी दिला चिखलापार पूरग्रस्तांना सहारा चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी राबविले धाडसी उपक्रम

आमदारांनी दिला चिखलापार पूरग्रस्तांना सहारा

चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी राबविले धाडसी उपक्रम


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर:- चिमूर तालुक्यात २ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लाखोंची नुकसान झाली तर अनेक पाळीव प्राण्यांचे सुद्धा जीव गेले,त्यातच चिमूर पासून जवळच असलेल्या सावरगाव जवळील नदीच्या काटावर वसलेले चिखलापार गाव आहे. दोन दिवसांपासून येत असलेल्या मुसळधार पाण्याने गावात पाणी घुसून गावातील लोकांना घराच्या बाहेर निघणे अश्यक्य केले होते. त्या जनतेला बाहेर पडता येत नव्हते याची माहिती चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांना कळताच त्यांनी पोलीस पथकासह चिखलापार येथे जाऊन  पुरात फसलेल्या लोकांना गावाबाहेर काढण्यासाठी सुरवातीला प्रयत्न करून गावातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, नंतर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी पूरग्रस्त लोकांनां चिमूर येथिल शेतकरी भवन येथे त्यां संपूर्ण गावकऱ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी करून दिली व आज दिनांक.२७/०८/२०१९ ला सकाळी शेतकरी भवन चिमूर येथे चिखलापार गावातील लोकांची भेट घेऊन त्यांना सुखरूप गावात सोडण्यासाठी स्वतःची गाडी वापरून त्यांना पुन्हा गावात सुखरूप पोहचवण्याचे धाडस आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले. त्यावेळी आमदार बंटी भांगडीया सोबत निलम राचलवार,सचिन फरकाडे,सुरज नरुले, विक्की कोरेकार,कलीम शेख, फिरोज पठाण,  चिखलापार येथील सरपंच संतोष डांगे व आदि यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!