ठानेदारच्या सतर्कतेने दारू तस्करीचा डाव उधडला २० लाखाचा मुद्देमाल जप्त
ठानेदारच्या सतर्कतेने दारू तस्करीचा डाव उधडला
२० लाखाचा मुद्देमाल जप्त
वरोरा - प्रतिनिधी (आलेख रट्ठे)
वरोरा : - वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत आज २७ ऑगस्ट ला झालेल्या कारवाईदरम्यान विविध ठिकाणी धाडी टाकून उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा ठाणेदार उमेश पाटील यांनी दारु तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मागील पाच वर्षांपासून अवैध दारु तस्करी करणारे विविध प्रकारे शक्कल लढवीत दारूची तस्करी करीत आहे. दारूबंदी जिल्ह्यात नवनवीन शक्कल लढवून जिल्ह्यामध्ये दारू आणली जाते याचाच प्रकार आज वरोरा शहरांमध्ये पाहायला मिळाला.मंगळवारी सकाळी अंदाजे ५ वा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नंदोरी टोलवर पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून दारु तस्करी करणाऱ्या पाच युवकांना वरोरा ठाणेदारांनी रंगेहात पकडून बडगा काढला.
सविस्तर मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश शंकर गुप्ता वय २६ राहणार नागपुर याने त्यांच्या सहकार्यासोबत दारु तस्करी करण्यासाठी नवीनच शक्कल लढवली. आकाश नी झूम कार ॲप द्वारे गाडी बुक केली. गाडी क्रमांक ब्रीजा एम एच-४३ बी जी ९६१९ व केव्ही एम एच ४३ बी जी ७४६९ या या दोन कार ऑनलाइन पद्धतीने बुक करून त्याचा गैरवापर करीत इतवारी नागपूर मधून एका गाडीत देशी दारूच्या अठरा पेट्या भरून थेट राजुरा येथे नेण्याचे ठरले होते. तर दुसरी गाडी ही पायलेटिंग साठी वापरण्यात आली होती. परंतु वरोरा पोलिसाच्या मुसद्दिने यांचा डाव नंदुरी टोल नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून हाणून पाडला.
दुसऱ्या घटनेमध्ये वरोरा जवळील मार्डा रोड वरून दुचाकीने दारू येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचारी निखिल कौरासे नी गुप्त माहितीच्या आधारे पल्सर क्रमांक एम एच ३१ बी एक्स ६५४ या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. त्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला परंतु दुचाकीस्वार दारू तस्कर काही अंतरावरून गाडी टाकून पळून गेला. या गाडीत नवीनच शक्कल लढवली होती. या पल्सर मध्ये सीटच्या खाली व पेट्रोल टंकी मध्ये दारू ठेवण्याची जागा बनवली होती. त्यामुळे पोलिस सुद्धा अचंबितच राहाले. या दुचाकी मध्ये एकूण ३ पेटी देशी दारू आढळून आली. तर आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
तर तिसर्या घटनेमध्ये टेमुर्डा या गावांमध्ये एम एस इ बी च्या खुल्या पटांगणात दारू असल्याची खबर पोलिसांना मिळाली. या खबरे च्या आधारे मंनेकर यांच्या घराशेजारी देशी दारूच्या १४ पेट्या हस्तगत करण्यात आल्या.
अशा ४ गुन्ह्यात एकूण २९ पेट्या देशी दारू सह दोन चारचाकी वाहन एक दुचाकी व ५ मोबाईल असा अंदाजे २० लाखाचा मुद्देमाल वरोरा पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उमेश पाटील, पी.एस.आय. विनीत घागे, पीएसआय प्रकाश चौधरी, पो.हे.का दिपक दुधे, मदन येरणे, पो शी श्रीकांत नागोसे, निखिल कौरासे , प्रवीण निकोडे, मंगेश शेंडे, नरेश टिपले, प्रसाद यांच्या अथक परिश्रमाने ही कारवाई करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!