सहकारी संस्था गटसचिव संघटनेचे कामबंद आंदोलन

सहकारी संस्था गटसचिव संघटनेचे कामबंद आंदोलन

१९ ऑगष्ट ते २१ ऑगष्ट २०१९ पर्यंत तीन दिवसीय लक्षांकीत कामबंद आंदोलन


नेरी/प्रतिनिधी :- (शुभम बारसागडे)
         
इतर कर्मचारी संघटनेप्रमाणे आज पर्यंत कधीही सहकारी संस्था संघटनेने कामबंद करून आंदोलन केललेे नाही. त्यामुळे शासनानेही गटसचिवाकडे आजतागायत लक्ष दिलेले नाही. व वेळोवेळी फक्त आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण केली त्यामुळे संस्था गटसचिव विविध मागण्यासाठी दि. १९ /८/२०१९ ते २१/८/२०१९ या तीन दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी / सेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्था नियुक्त गटसचिव संघटना शाखा चिमूर यांचे मार्फतीने काम बंद आंदोलन करणन्यात येणार आहे.
            मागील अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी संस्था गटसचिव हे सनदशीर मार्गाने निवेदन देत होते मात्र शासनाकडून मागण्यांसंदर्भात कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. कर्जमाफी असो,  पीक विमा वा प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना कर्ज वाटप असो किंवा इतर शासनाचे विविध योजना असोत  ते सर्व कामे वेळेवर करून देण्याचे शासनाकडून सांगण्यात येते मात्र गटसचिवांचे प्रश्न सांगताच मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने गटसचिवांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्या करीता तीन दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
             यात संस्था सचिव हे शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याने व शासनानेच सर्व उपक्रम राबवित असल्याने गटसचिवानां शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, तलाठी, ग्रामसेवकांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे,  संस्था गटसचिवाणा पूर्वीप्रमाणे कॅडर मध्ये समाविष्ट करणे, जिल्हास्तरीय समिती गटसचिवाचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ असल्याने ते अधिकार शासनाने स्वतःकडे घ्यावेत आदी मागण्यासह कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन गटसचिव कर्मचारी वर्गाने दि. १४/८/२०१९ ला सहाय्यक निबंधक यांचे मार्फतीने जिल्हा निबंधक व शासनाला देण्यात आले.
        यावेळी  तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रशांत ठावरी, संघटना सचिव मंगेश मस्के, जिल्हा संघटना कार्यवाह प्रदीप बंडे, संघटना सदस्य विनोद बारसागडे, सुधाकर कुंदोजवार,राजू कामडी, मंगेश मुंगुणे, पंकज रणदिवे, प्रशांत पिसे, दिपक पाचभाई, सुधाकर चौधरी, ज्ञानेश्वर डेकाटे, महेंद्र मत्ते आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!