खुटाळा- हरणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

खुटाळा- हरणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी करावी लागते खूप मोठी कसरत


नेरी/चिमूर: (शुभम बारसागडे)

तालुक्यातील नेरी जवळील खुटाळा ते हरणी जाणाऱ्या संपूर्ण पांदण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सध्या शेती च्या हंगामाचे दिवस सुरू असून, रोवणी ची कामे जोमात सुरू आहेत. खुटाळा तसेच हरणी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेती ह्या पांदण रस्त्यावर, रस्त्यालगत असून जाण्या-येण्यासाठी हा एकच रस्त्या असल्याने दैनंदिन शेतीच्या कामकाजाकरिता येथील शेतकऱ्यांना दररोज ह्या रस्त्याने रहदारी करावी लागते मात्र, सध्यस्तीतीत या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चिखल पसरला असून, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातच शेतावर चिखलटी मारण्यासाठी ट्रेकटर नेहमी या रस्त्याने जात असल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून मोठमोठ्या खड्डयातून रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे बैलबंडी धारक शेतकऱ्यांना अडथळा निर्माण झाला असून, बैलबंडी नेण्या-आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तेव्हा शेती करायची कशी असा प्रश्न उपस्तीत होत असून, शेतकऱ्यांत रोष व्यक्त केल्या जात आहे.
 दर वर्षी येथील शेतकऱ्यांना ह्या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र यावर्षी या रस्त्याची समस्या अधिक गंभीर आहे. मागील वर्षी रस्त्यावरील खड्यांवर मुरूम पसरवून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र समस्या जैसे थेच आहे. 
----------------------------------------
या पांदण रस्त्याच्या खडीकरणासाठी ऑनलाईन टेंडर टाकण्यात आले आहे. मात्र, टेंडर MRGF चे असल्याने टेंडर घेण्यास कुणीही तयार नाही
किशोर जांभूळे सरपंच ग्रा.पं खुटाळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!