देशभक्तीचा निनादात गांवफेरीतुन 73व्या स्वातंत्र दिन मोट्या उत्साहात साजरा

देशभक्तीचा निनादात गांवफेरीतुन 73व्या स्वातंत्र दिन मोट्या उत्साहात साजरा


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चंद्रपूर जिल्हातील चिमूर तालुक्यातील मौजा पळस गांव येथे आज दिनांक 15 ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिनी’ स्वतंत्र्य भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील शाळा महाविद्यालय, सामाजिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी संस्था,  कार्यालय ,राजकीय क्षेत्रातून ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने च्या  वतीने गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली होती.  मान्यवरांकडून देशाला समर्पीत झालेले नेते आणि शहीदांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कु जानवी सुनील ठाकरे या विद्यार्थ्यांना आपल्या लहान मुखी गोड शब्दातून मार्गदर्शन केले,त्याच प्रमाने सुविधा खोब्रागडे हिने देश भक्ती पर गीत सादर केले, या  संपुर्ण कार्यक्रम मध्ये शाळा अद्यक्ष,सरपंच,ग्राम पंचायत सदस्य सर्व कर्मचारी वर्ग तथा सर्व शाळा समिती सदस्य,गावातील प्रतिष्ठा त वेक्ती याच्या  उपस्थिती शिवानी विद्यालय,आश्रम शाळा ,व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व शिक्षकांच्या उपस्थिती मध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!