स्टॅम्प पेपर विक्रेत्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकाना होणारा त्रास दूर करावे चिमूर तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत डवले यांची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
स्टॅम्प पेपर विक्रेत्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकाना होणारा त्रास दूर करावे
चिमूर तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत डवले यांची मागणी
उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील गावा - गावातील नागरिक व आपल्या पाल्याचे कागदपत्रे तयार करण्यासाठी व नाहरकत प्रमाणपत्रे व जमिनीनि संबंधित फेरफार करण्यासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते शेतकरी आपली मोल मजुरी सोडून तहसील कार्यालयात येत असतात मात्र प्रमाणपत्रे कागदपत्रे जमा करताना मोठी धावपळ करावी लागत असते त्यातच स्टॅम्प पेपर विक्रेता यांचे कडून स्टॅम्प घेतांना आमच्या कडे स्टॅम्प पेपर आहे व या स्टॅम्प वर आमच्या कडून मॅटर छापत असाल तर आपल्याला स्टॅम्प मिळेल नाहीतर स्टॅम्प संपले आहे असे उत्तर देत असतात व उद्या या परवा या असे उडवा उडवीचे उत्तरे ग्राहकांना देत असतात.
त्यावर प्रति १०० रुपये दराच्या स्टॅम्प पेपर वर ३% कमिशन असतानाही हे मुद्रांक विक्रेते त्यापेक्षाही १० रुपयांनी अधिक शुल्क ग्राहकांकडून आकारतात, या कडे मात्र शासनाचे लक्ष नसल्याने स्टॅम्प विक्रेत्यांची मनमानी कारभार सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .चिमुरातील शासनाने जुने मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे,व तहसील कार्यालयाच्या आवारात बसून मुद्रांक विक्री करणाऱ्या इच्छुक सुशिक्षित बेरोजगारना रोजगाराची संधी उपलब्ध होईल या दृष्टीने मुद्रांक विक्री परवाने देण्यात यावे जेणे करून गावागावातून आलेल्या गोरगरीब जनतेला होणारा त्रास दूर होईल तसेच नागरिकांना आवश्यक कामाकरिता लागणारे स्टँप पेपर उपलब्ध होईल अशी मागणी चिमूर तालुका युवक कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत डवले यांनी उपविभागीय अधिकारी बहेरे साहेबाना निवेदनातून केली आहे .यावेळी चिमूर तालुका युवक काँग्रेस संघटक राकेश साठोने, नाजीमा पठाण, प्रशांत राजनहिरे,आशिष चौधरी, चंद्रबोस मेश्राम, घरत काकाजी, बन्सोड मॅडम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!