चिमूर तालुक्यातील संगणक परिचालका मार्फत पंचायत समितीवर एक दिवसीय धरणे आंदोलन
चिमूर तालुक्यातील संगणक परिचालका मार्फत पंचायत समितीवर एक दिवसीय धरणे आंदोलन
धरणे आंदोलनास चिमूर ग्रामसेवक संगटनेने दिले जाहीर पाठिंबा
मुख्य मागण्या
संगणक परिचालकांचे स्थगित मानधन त्वरित मिळणे
आय. टी विभाग मार्फत नियुक्ती तात्काळ देण्यात यावी
ज्या ग्राम पंचायत नि rtgs मारले नाही त्यांनी मारायला बादय करणे मारीत नसल्यास त्या वर कारवाही करणे
अवांतर कामे न सांगणे
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावा गावात डिजिटल इंडिया चे काम ऑनलाइन करुन शासनाला नं १ वर पुरस्कार मिळवुन देणारे ग्राम पंचायत केंद्र चालक मात्र १०ते १२ महिन्यापासून पगारा विना बेहाल झाला आहे तसेच त्याचा पारिवारिक जीवनाचा गाडा मात्र स्तब्ध झाला आहे . संगणक परिचालक यांचा २६ तारखेला twetr मोर्चा करण्यात आला यांतनर आज धरणे आंदोलन करण्यात आले, २६ डिसेंबर रोजी अधिवेशन चालू असताना केंद्र चालकाने मुंबई अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला तेव्हा शासनाने आय. टी महामंडळत सामावुन घेण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी मा. उद्धव ठाकरे साहेब सुद्धा याबद्दल या विषयावर मार्ग काढत आश्वासन दिले होते मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.
तालुक्यातील काही ग्राम पंचायत नि rtgs मारले तर काहींनी अजूनही मारले नाही ,ज्या अजून पर्यंत rtgs मारले नाही त्या ग्राम पंचायत वर पंचायत समितीच्या अधिकारी वर्गणी कारवाही करणे,महाराष्ट शासनाने संगणक परिचालक अन्याय केला असून शासनाच्या चुकिमुळे काम बंद करायला भाग पाडीत असुन आज नाईलाजाने धरणे आंदोलन करावे लागत आहे,प्रत्येक ग्राम पंचायत ला डिव्हाईस खरेदी करण्यात यावा,व ups खरेदी करण्यात यावा.
असल्या रास्त मागण्या घेहून चिमूर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत मधील संगणक परिचालक यांनी दिर्घ काळ काम बंद ठेवले असून आज एक दिवसीय आंदोलन करन्यात आले . सदर धरणे आंदोलनास ग्रामसेवक संघटना यांनी प्रतिक्ष उपस्थिती दर्शवून जाहीर पाठिंबा दिला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे तरी शासनाने ग्रामपंचायत सेवा स्थगित न करता केंद्र चालक यांना न्याय द्यावा व मागण्या मान्य कराव्या असल्या मागण्या घेऊन चिमूर मधील ग्राम पंचायत केंद्र चालकाने काम बंद करून आज पंचायत समिती चिमूर च्या प्रांगणात एक दिवसीय धरणे आंदोलन चे अस्त्र उपसले असल्याची माहिती सुनील गूळधे अध्यक्ष,शैलेंद्र पाटील सचिव संगणक परिचालक संघटना चिमूर,अकबर रामटेके उपाध्यक्ष , माजी अध्यक्ष प्रशांत डवले,आकाश शामकुळे,प्रदीप माहूर,सुरेश मेश्राम , विकास खोब्रागडे , यांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!