मोकाट जनावरांमुळे शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ नगरपरिषदेने बंदोबस्त करावा - प्रा.सुयोग बाळबुधे यांची मागणी
मोकाट जनावरांमुळे शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
नगरपरिषदेने बंदोबस्त करावा
- प्रा.सुयोग बाळबुधे यांची मागणी
ब्रम्हपुरी - प्रतिनिधी ( स्वप्नील अलगदेवे )
ब्रम्हपुरी :- शहरातील मुख्य मार्गाने व ब्रम्हपुरी-नागभीड-वडसा-आरमोरी मार्गावर मोठया प्रमाणात पाळीव जनावरांचा वापर वाढला असून,येथे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अनेकांचे जनावरांच्या वावराणे अपघात होऊन दुखापती झाल्या आहेत.त्यामुळे पालिका प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन शहरातील प्रमुख मार्गा वरील व ब्रम्हपुरी-नागभीड-वडसा-आरमोरी या मार्गावरील ठिय्या मांडून राहत असलेल्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मा.मुख्याधिकारी याना निवेदन देऊन प्रा.सुयोग बाळबुधे अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
नुकताच दिनांक २३/०८/२०१९ ला रात्री रस्त्यावर बसलेल्या म्हशींच्या कळपाल ट्रॅव्हल्स ने दिलेल्या जोरदार धळकेत ३-४ म्हशींचा घटनास्थळी मृत्यू झाला व एक म्हैस गंभीर जखमी झाली.असा अपघात भविष्यात सुद्धा होणे नाकारता येत नाही.अशा मोकाट जनावरांचा मालकांना पालिकेला तर्फे मोकाट सोडू नये अश्या सूचना पालिकेतर्फे देण्यात याव्यात किव्हा त्यांना कांजी मध्ये टाकण्यात यावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे स्वतः त्यांना गोशाळेत सोडण्यात येईल अशी सूचना सुद्धा मा.मुख्याधिकारी याना देण्यात आली त्याच प्रमाणे ख्रिस्तानंद चौकात ट्रॅव्हल्स चा थांबा असून अतिशय बेशीस्ती प्रमाणे ट्रॅव्हल्स रोड वर लावतात त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावे लागते त्याकरिता ट्रॅव्हल्स स्टेशन बदलून दुसरी जागा त्यांना नेमून द्यावी व गावातून त्यांच्या वेगेवर नियंत्रण ठेवण्याकरिता वेगाचे बंधन लावण्यात यावे ही विनंती सुद्धा निवेदनात करण्यात आली.पुढील आठ दिवसात या विषयावर तोडगा पालिकेने न काढल्यास भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराच्या वतीने कडक भूमिका घेतली जाईल.निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्च्याचे शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें,दत्ता येरावर,भरत सावकार,प्रांजल माकोळे,अमोल बंडे आदी कार्यकते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!