सिंदेवाही नगर पंचायत येथे महिला दिन

सिंदेवाही  (शशीकांत बतकमवार)

नगरपंचायत जिल्हा चंद्रपूर वतीने नगरपंचायत सभागृह येथे जागतिक महिला दिनानिमित्य जागतिक महिला   दिन साजरा करण्यात आले.

            सदर कार्यक्रमाचे उदघाटक श्रीमती शांताबाई पाझारे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष  सौ. सरला नवले हे  होते, प्रमुख मार्गदर्शक प्रा. श्रीमती बैतुले, सर्वोदय महाविदयालय सिंदेवाही

कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून सौ. मोहिनी गेडाम, नगराध्यक्ष, नगरपंचायत सिंदेवाही, सौ. पुष्पा मडावी, सभापती महिला बालकल्याण समिती, सौ. शालीनी बोरकर, उपसभापती महिला बालकल्याण समिती, सौ. सौ. छाया हाडगे, सभापती पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती, सौ. प्रणाली जिवणे, सभापती सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती, सौ. गीता पर्वते, सौ. शालीनी सावळे, सौ. प्रिती गणवीर, सौ. मंदा भैसारे, सौ. अंजली बल्लेवार, नगरसेविका, सौ. रत्नमाला भरडकर, नगरसेविका, सौ. नंदा बोरकर, नगरसेविका, सौ. आशा गंडाटे, नगरसेविका उपस्थिती होते.

               कार्यक्रामचे विधी पुजन करुन उदघाटन कार्यक्रम झाल्यांनतर प्रमुख मार्गदशक प्रा. श्रीमती प्रिती बैतुले यांनी व उपस्थित मान्यवरानी  जागतिक महिला दिनानिमित मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये सिंदेवाही शहरातील सर्व अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस तसेच बचत गटातील बहूसंख्य महिला उपस्थित होते.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सौ. मोहिनी गेडाम, नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही यांनी केली, तर कार्यक्रमाचे संचालन सौ. पुष्पा मडावी, सभापती महिला बालकल्याण समिती, तसेच आभार प्रदर्शन सौ. छाया हाडगे, सभापती पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!