महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
सर्वोदय विद्यालयाचा उपक्रम
महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
सिंदेवाही (शशीकांत बतकमवार)
येथिल सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सिंदेवाही परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात नगराध्यक्षा मोहिनी गेडाम, उद्योजिका स्नेहा कटकमवार, महिला पोलीस अर्चना सिडाम, बचत गट प्रमुख छाया भरडकर, भाजी विक्रेता सुमन वलकेवार, सफाई कर्मचारी नंदा रगळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांचे हस्ते सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. प्रमुख अतिथी पर्यवेक्षक विलास बाल्लावार, जेष्ठ शिक्षिका सिमा ब्राम्हणकर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी बांगडे व प्रा. जयश्री नागापुरे यांनी तर आभार मनिषा पर्वते यांनी मानले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी किरण बेदी, लता मंगेशकर, सायना नेहवाल, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, रमाबाई, मेरी कोम, बयनाबाई ,राणी लक्ष्मी बाई,यांच्या भुमिका साकार करुन संदेश दिला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी साठी प्रा. नम्रता मंदेवार, प्रा. स्मिता भावे, भाग्यश्री कोल्हे, कल्पना खरे, शिंदे यांनी परिश्रम केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!