महिलादिनी कोलामगुड्यात रंगली सुरेस सुरांची मैफिल

महिलादिनी कोलामगुड्यात रंगली सुरेस सुरांची मैफिल कोलामी गितांनीही चढविला साज-कोलाम विकास फाऊंडेशनचा उपक्रम

जिवती (शब्बीर जागीरदार)

जिवती तालुक्यातील अतीदुर्गम अशा सितागुडा या कोलामगुड्यावर आज (ता.9) सुरेल स्वरांची मैफिल रंगली आणि सुरात सुर मिसळून कोलामी महिलांनीही गितांचा मेळ जूळवून आणला. निमीत्त होते जागतिक महिला दिनाचे.

ह्रदयाला भिडणा-या आवाजात गायिका अल्का सदावर्ते यांनी 'तु कितनी अच्छी है...ओ माँ' हे गित सादर करताच कोलाम महीला मंत्रमुग्ध झाल्या. प्रत्यक्ष आपल्या अंगणातील मांडवाखाली सुरेल गितांची मैफिल रंगल्याचे पाहून कोलाम गुड्यावर चैतन्य संचारले. सुरेल आवाजात एका गायिकेला सूर आळवताना पाहून कोलाम महिलांनाही आपला मोह आवरला नाही. त्यांनीही एका सुरात कोलामी गित सादर केले. कोलाम विकास फाऊंडेशनने महिला दिनाचे औचित्य साधून सितागुडा(पाटण) येथे महिला समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. वंदनाताई चटप उपस्थीत होत्या. प्रमुख मार्गदर्शीका म्हणून मा.प्रा. जोत्स्ना मोहीतकर व सुपरिचित गायिका मा. अल्का सदावर्ते उपस्थित होत्या. मंचावर शुभांगी वाटेकर, सुनैना तांबेकर व मिरा कुळकर्णी या उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना प्रा. मोहितकर म्हणाले की, उपेक्षीत राहीलेल्या घटकांच्या समस्या या पुरातन ग्रामिण जिवनाची आठवण करून देणा-या आहेत. अद्यापही शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत सोयींची कमतरता अशा वस्त्यांवर दिसून यावी ही बाब अतिशय वेदनादायी आहे.

सदावर्ते यांनी सागितले की, कोलामवस्यांच्या विकासासाठी समाजमन एकवटण्याची नितांत गरज आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना वंदनाताई चटप म्हणाल्या की, कोलाम गुड्यावरील महिलांनी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आग्रही राहून, समाजाच्या प्रगतीसाठी खंबीरपणे एकजुटीने लढा उभारला पाहीजे.

यावेळी स्वरप्रिती कला मंचच्या संचालिका अल्का सदावर्ते व सहका-यांनी सुरेल गिते सादर केलीत. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सुनिता कुंंभारे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!