रात्रोच्या अंधारात ११ वाजता रुग्णा विना पोलिओ बॉक्स व वॅक्सीन सोबत घेऊन अधिकारी फिरत असतात तेव्हा काय ?

रात्रोच्या अंधारात ११ वाजता रुग्णा विना पोलिओ बॉक्स व  वॅक्सीन सोबत घेऊन अधिकारी फिरत असतात तेव्हा काय ? 


चिमूर - प्रतिनिधी

     विलास मोहिनकर


चिमूर  : - दिनांक.०९/०३/२०१८ ला जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्र ईथुन रात्रोच्या अंधारात चिमूर कडे ११ वाजता भरधाव वेगात सायरन वाजवीत रुग्णा विना पोलिओ वॅक्सीन बॉक्स सोबत घेऊन अधिकारी रुग्ण वाहिकेने  फिरत असतात तेव्हा ? व चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैधकिय अधिक्षक डॉ.गो.वा. भगत यांना या विषयी माहिती असून यावर कुठल्याही प्रकारची कारवाही न करता अशा प्रकारांना चालना देण्याचे कार्य शासनाच्या शासकिय अधिकाऱ्यांमार्फत होत आहे असे दिसते.यामुळे या शासकिय कर्मचारी तसेच डॉक्टर यांच्या चुकिमुळे लहान बाळांना कुपोषित व्हावं लागतं योग्य त्या पद्धतीचे नियमानुसार पोलिओ चे डोसेस मिळाले नाही तर बाळास कुपोषणाच्या आहारी जाण्यास विचारावे लागणार नाही अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकारी लक्ष न देता या सर्व प्रकारास सहकार्य करण्याचे कार्य करीत असतात याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करून अधिकाऱ्यांना योग्य त्या प्रकारे विचारणा करायला हवी व नियमानुसार   प्लस पोलिओ लसिकरण मोहीम राबवायला पाहिजे असे समस्त चिमूर वासिय नागरिकांचे मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!