मिशन २०१९ साठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.-नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सावलीत कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन

"बसस्थानकाचे भुमिपुजन, पो.स्टे. लोकार्पण, ग्रंथालयाचे हस्तांतरण"
सावली ला आदिवासी वसतिगृहाची मंजुरी

सावली( प्रविण झोडे) स्वातंत्र्या नंतर या देशात कांग्रेसने सत्तर वर्षांचा राजकारभार सांभाळला, या कालावधीत शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचू शकल्या नाहीत, शिक्षण, रस्ते, आरोग्य, पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सर्व समस्या सोडविण्यासाठी कांग्रेस असमर्थ ठरले, त्यामुळे जनतेने काँग्रेसला नाकारून २०१४ च्या निवडणूकीत मोठे सत्तांतर करीत विकासाच्या दृष्टीने भाजपवर विश्र्वास ठेवला, नरेंद्रजी मोदींच्या रुपाने एक वेगळे नेतृत्व देशाला मिळाले, केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार येताच विद्यमान सरकारने सामान्याचे हित जोपासण्याचे काम केले, आता नुकत्याच निवडणूका होणार आहेत तेव्हा मिशन २०१९ साठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज होऊन पुन्हा एकदा देशाची नेतृत्व करण्याची संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. सावली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा व भाजपा कार्यकर्त्यां मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मंचावर उद्घाटक म्हणून राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. विशेष अतिथी माजी आमदार प्रा.अतुल देशकर, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, जी.प.बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा भाजप महामंत्री संजय गजपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल, संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष तथा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, प.स.सभापती छाया शेंडे,उपसभापती तुकाराम ठिकरे, जि. प. सदस्य योगीता डबले, मनिषा चिमुरकर, प. स. सदस्य गणपत कोठारे, रवि बोल्लीवार,भाजप जिल्हा सचिव देवराव मुद्दमवार, गंगाधर कुनघाडकर व भाजपा पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. या क्षेत्रातील जनता भाजपावर प्रेम करणारी आहे त्यामुळे अनेकदा या जनतेने भाजपाला नेतृत्वाची संधी दिली. मात्र मागील निवडणुकीत जनतेने केलेली चुक भरून काढण्यासाठी मिशन २०१९ च्या निवडणूकीसाठी सर्व शक्ती पणाला लावून सज्ज झाले पाहिजेत त्यासाठी आपल्या भागातील सेक्टर, बुथ वरून किमान ५० टक्के हुन अधिक मत मिळतील असा प्रयत्न करावा लागणार आहे. या जिल्हाचा पालकमंत्री या नात्याने दोन कोटी रुपये चे सूसज्ज सार्वजनिक ग्रंथालय, दिड कोटी रुपये अत्याधुनिक व्यायाम शाळा,जागा उपल्बध झाल्याबरोबर इको पार्क, सावली तालुकातील जे वंचित आहे त्यांना उज्ज्वला गस कनेक्शन, एपीएल धारकांना ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना २ व ३ रुपये प्रमाणे अन्य धान्य,सावली तालुक्यातील जे दिव्यांग ४० टक्के असेल त्यांना प्रत्येकी ४५हजार रुपये ची तिनचाकी बॅटरी चार्ज सायकल, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ना इमारत नसेल त्यांना इमारती व वालकंपाउंड सहित बनवून देणार, संजय गांधी,श्रावणबाळ, घटस्फोटीत महिला ना येत्या जून मध्ये वाढीव भत्ता देणार आहोत. पाण्याची समस्या असलेल्या गावांना सोलर पाणी योजना साठी ५ कोटी रुपये देणार, सावली येथे आदिवासी मुलांना, मुलींना वस्तीगृह मंजूर करीत असल्याची घोषणा यावेळी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.पालकमंत्री च्या या घोषणांना उपस्तीतांनी टाळ्या वाजवून प्रचंड प्रतिसाद दिला.
मेळाव्याच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संचालक मंडळाने ना.सुधीर मुनगंटीवार, खा.अशोक नेते.माजी आमदार अतुल देशकर शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. सावली येथे नवीन बसस्थानकाचे भुमिपुजन, पोलिस स्टेशन इमारतीचे लोकार्पण, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथील नवीन ग्रंथालय इमारतीचे हस्तांतरण, आदी कार्यक्रम मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचा वरील अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम झाडे,प्रास्ताविक अविनाश पाल, आभार दिलीप ठिकरे यांनी व्यक्त केले, मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांची बहुसंख्य उपस्थिती होती.