भीमकुंडावर भाविकांची गर्दी उसळणार
भीमकुंडावर भाविकांची गर्दी उसळणार
तिर्थक्षेत्राला ऐतिहासिक पार्श्वभूमी.
महा शिवरात्री विशेष

पोंभूर्णा (जवाहर धोडरे)
पोंभूर्णा तालुका स्थळापासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या थेरगाव येथील भीमकुंडावर भाविकांची गर्दी उसळणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भाविकांना भीमकुंडावर अभ्यंग स्नानाचा भक्तीभावाने आनंद घेता येणार आहे.येथील अंधारी नदीपात्रात यावर्षी वाळूघाटांचा लिलाव न झाल्याने तीन फुटापेक्षा वर पाणी असल्याने पश्चिम घाटावरुन भक्तीभावाने आंघोळीचा आस्वाद घेता येणार आहे.येथील तिर्थक्षेत्राला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून नदीच्या पात्रात प्राचीन अवशेष आहेत.नदीपात्रातच रुंद दगडावर पावलांचे ठसे आणि एक कुंड आहे.त्याला लोक भीमकुंड असे म्हनतात.जून्या लोकांचे म्हणणे आहे की, फार पूर्वी येथे भीम आला होता.दरवर्षी येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते.यात्रेला परिसरात असलेल्या गावातील नागरिकांची हजेरी असते.अंधारी नदीच्या पात्रात आंघोळ केली की पवित्र होतो,असेही जुने लोक सांगतात.नदीच्या तिरावर श्रीरामाचे मंदीर असून पंचेविस तीस वर्षापूर्वी स्व.गणपतराव धोडरे महाराज यांनी हे मंदिर बांधले आहे.दरवर्षी श्रीरामनवमीला येथे भजन-किर्तन होतात व महाप्रसादाचे वितरण केले जाते.मंदिरासमोरच बजरंगबलीचे मंदिर असून कचरु महाराजांची समाधीही बाजुला आहे.भाविक मोठ्या संख्येत येथे येतात व नारळ फोडून पूजाअर्चा करतात.नदीपात्रात व तिरावर पाल बांधून जत्थेच्या जत्थे स्वयंपाक करुन नैवेद्य मंदिरात पोहचवून नंतरच जेवतात.गरिबांची हेच मार्कंडा व काशी म्हनत येणा-या भाविकांची गर्दी वाढत असून या स्थळाला तिर्थक्षेत्र घोषित करावे व भाविकांना भीमकुंडावर जाण्यासाठी रस्ता उभारुन द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.येथे सभागृहाचे बांधकाम सुरु असून वादळपावसात सभामंडप उपयुक्त ठरणार आहे.
लोक -प्रतिनिधीं चे दुर्लक्ष
थेरगाव नजीक अंधारी नदीजवळ असलेल्या भीमकुंडावर दर्शनासाठी शेकडो भाविक दरवर्षी येतात.महाशिवरात्रीलाही यात्रा भरते.मात्र या परिसराचा विकास अद्यापही थंडबस्त्यात आहे.जाण्यासाठी येथे व्यवस्थित मार्ग नाही.भाविकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.याकडे सा-यांनीच दुर्लक्ष केले आहे.