विदर्भ विध्यार्थी संगटनेचा रास्ता रोको आंदोलन आठव्या दिवशी नारायण जांभूळे यांनी आमरण उपोषण घेतले मागे
विदर्भ विध्यार्थी संगटनेचा रास्ता रोको आंदोलन
आठव्या दिवशी नारायण जांभूळे यांनी आमरण उपोषण घेतले मागे
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - दिनांक.०५/०३/२०१९ माना समाजाच्या आदेशाच्या परिपत्रिकाची अंमलबजावणी व विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभूळे यांच्या नेतृत्वात मागील आठ दिवसांपासून आमरण साखळी उपोषण तहसील कार्यालय समोर सुरू असताना शासनाने अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतली नसल्याने विध्यार्थी संगटनेच्या वतीने मंगळवारला तहसील कार्यालय समोर सुरू असलेल्या उपोषण मंडपाच्या सामोर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले परंतु माना समाज बांधवांच्या आग्रहास्तव नारायण जांभूळे यांनी आमरण उपोषण मागे घेतले. व उच्च न्यायालयाने वेळोवेळी माना समाजाच्या पारीत केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीता विदर्भातील माना समाजाने निवेदने दिली होती.परंतु मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन दोन महिन्यात परिपत्रक काढू असे सांगितले असे आश्वासन दिले , मात्र अजूनही शासनाने परिपत्रक काढले नाही, हि माना समाजाची दिशाभूल या भाजप सरकार ने केली त्यामुळे मागील २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले असून आज मंगळवरला उपोषणाचा ८ वा दिवस असतांना विदर्भ विध्यार्थी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी उपोषण मंडपात सभा घेऊन समाजबांधवांना संबोधित केले. यावेळी पाच हजाराचे वर समाजबांधवांची उपस्थिती होती. या दरम्यान अरविंद सांदेकर , चंद्रपूर जिल्हा अद्यक्ष देविदास जांभूळे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष हरिदास श्रीरामे, हरीभाऊ बारोकर, शिवशेना तालुका चिमूरचे विलास डांगे , व विदर्भातून आलेले बरेच समाज बांधवांनी यावेळी संबोधित केले.त्यानंतर विदर्भ विध्यार्थी संघटनेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.जवळपास अर्धा तास आंदोलन सुरू होते.लगेच चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद मडामे यांनी १९ पुरुष व १७ महिलांना अटक करून सुटका करण्यात आली. अखेर नारायण जांभूळे यांनी माना समाज बांधव व शासनाच्या आश्वासनामुळे आमरण उपोषण मागे घेण्यात आले. या आमरण उपोषण दरम्यान उपोषण कर्त्यांची योग्य वेळी आरोग्य तपासणी वैधकीय अधिकारी डॉ.अश्विन अगडे यांनी केली असून शांतता राखण्यात ठाणेदार प्रमोद मडामे , पि.एस.आय. गणेश इंगोले व पि.एस.आय.किरण मेश्राम व आदि पोलिसांमुळे व त्यांच्या योग्य कामगिरीमुळे या उपोषणास्थळी काहिही अयोग्य प्रकार न घडता यश आले. असून माना समाज बांधवांच्या निर्णयाणेच व समाज बांधवांच्या हस्ते उपोषणाची निम्बु पाणी पाजून सांगता करण्यात आली. हा उपोषण माना समाजाच्या विविध मागण्यांसाठी मागील २६ फेब्रुवारी पासून तहसील कार्यालया पुढे विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांनी आमरण साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषणाचा आठवा दिवस उजाडला तरी या खोटारड्या शासनाकडून उपोषणाची दखल घेतली नाही त्यामुळे मंगळवारी शेकडों समाज बांधवाच्या उपस्थिती मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले मात्र झोपीचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाग येत नाही त्यामूळे या सरकारला येत्या निवडणुकित धडा शिकवने गरजेचे आहे व जांभुळे सारख्या नेत्याची समाजाला गरज आहे त्यामुळे समाज बांधवानी पुढाकार घेत समाज बांधवाच्या उपस्थिती मध्ये त्याच्या पत्नी व समाज बांधवाच्या हस्ते निंबु पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली असून यापुढे समस्त माना समाज बांधव एकत्रित येऊन कमिटी तयार करून संपूर्ण जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात माना समाज बांधवांतर्फे निवडणूक लढविल्या जाईल व आम्हा माना समाजाच्या आम्ही स्वतः पूर्ण करू असे नारायण जांभूळे यांनी उपोषण मागे घेत असतांना समस्त माना समाज बांधवां समक्ष व जनते समक्ष मत स्पष्ट केले व त्यानंतर उपचारा करीता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

