दरड कोसळून दोन मजुरांचा करून अंत

दरड कोसळून दोन मजुरांचा करून अंत

मुल( प्रकाश चलाख)

 मुल तालुक्यातील चिचाळा येथेे सुरू असलेल्या भूमिगत पाइपलाइनच्या कामात दरड कोसळल्याने दोन मजुरांच्या घटनास्थळीच अरुण अंत झाला असून उर्वरित एक मजूर गंभीर रित्या जखमी आहे .ही घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान चिचाळा येथे घडली असून मृतांमध्ये हरिदास मनोहर दुधबळे वय 40 राहणार चिचाळा ,रवी प्रेमलाल उईके वय 30 राहणार चिपिया जी .गोंदिया यांचा समावेश असून गजानन मुरलीधर मेश्राम वय 42 राहणार चिचाळा हा गंभीर रित्या जखमी आहे.

 तालुक्यातील चिचाळा येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री यांच्या संकल्पनेतून "चांदा ते बांदा" हा प्रकल्प नावारूपास येत असताना सदर कामावर काही मजूर काम करीत असताना आज ही दुर्घटना घडली. चिचाळा व लगतच्या सहा गावांना भूमिगत पाईपलाईन द्वारे शेतीला सिंचित करण्यासाठी पाईपलाईनचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे .23 कोटी 47 लाख 54 हजार प्रकल्पाची प्रस्तावित किंमत असून सदर योजना परिसरातील शेतकऱ्यांना नव संजीवनी ठरणार आहे.

 काही महिन्यापासून सदर प्रकल्पावर बाहेर तसेच स्थानिक मजुरांचा समावेश असून नेहमी प्रमाणे काम करीत असताना भूमिगत गटाराच्या काटावरील माती खसल्याने आत मध्ये काम करीत असलेल्या मजुरांवर मातीचा ढिगारा पडला त्यामुळे दोन मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून जागीच करुण अंत झाला. उर्वरित एक मजुर गंभीर रित्या जखमी असून त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

 सदर प्रकल्पाचे काम है पुणे येथील एन. एन. के. कन्स्ट्रक्शन कंपनी कडे असून त्यांच्या देखरेखीखाली काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आह. घटनेची माहिती मिळताच मुल पंचायत समिती चे सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवर नंदू रनदिवे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत गट्टूवार, ठाणेदार मुर्लीधर कासार यांनी घटनास्थळाला भेट दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!