मुन्नी परवीन यांच्या मनसेला जय महाराष्ट्र विवीध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश

मुन्नी परवीन यांच्या मनसेला जय महाराष्ट्र विवीध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश

राजूरा (शब्बीर जागीरदार)

टेकामांडवा येथे आज दिनांक,२३ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता हनुमान मंदीर परिसरात शेतकरी संघटनेची सभा आयोजन करण्यात आली या सभेचे अध्यक्षस्थानी अॅड.वामनराव चटप साहेब माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर दिवे विभागीय उपाध्यक्ष शेतकरी संघटना, सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाप्रमुख शेतकरी संघटना तालुका जिवती, देविदास वारे तालुकाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष, नरसिंग हामणे समन्वय प्रसिद्धी प्रमुख शेतकरी संघटना तालुका जिवती, उध्दव गोतावळे अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष, सय्यद जमीर तालुकाउपाधयक्ष स्वतंत्र भारत पक्ष, श्रीपती सोडणर तालुकाप्रमुख युवा आघाडी शेतकरी संघटना,सलाम भाई अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी शेतकरी संघटना, अशोक तांबरे तालुका संघटक शेतकरी संघटना, डॉ.माधव पांचाळ, बालाजी नरोटे, शिवाजी माने, बापूराव आमनर, बालाजी सोडणर, बालाजी कंचकटले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, माजी आमदार अॅड.वामनराव चटप साहेबावर विश्वास ठेवून मुन्नी परवीन मनसेचे तालुकाध्यक्ष महिला आघाडी जिवती यांनी जाहीर रित्या शेतकरी संघटनेत प्रवेश केला, कालीदां दुबळे, रेणुका दुबळे,हिमयत नगर, टेकामांडवा येथील लक्ष्मी बाई भोरे,कालींदा,तांबरे,कलावती गोटमवाड,प्रयागबाई सोडणर, विजयमाला तांबरे,कांतिबाई सोडणर,शांता बाई गोटमवाड, चंद्रकला आमनर, कमलाबाई पल्लवाड, सुर्यकला बाई आमनर,अनीता बाई येचवाड,कुलबाई होळगीर, रुखमाबाई गोटमवाड, संगीता सोलंकर, निर्मला आमनर, गणपत देवरवाड, परमेश्वर हाके, दिलीप पांचाळ, नामदेव लिंगवाड, जयसिंग नारनाके, राजु सोडणर, संविधान साबने हिमायत नगर इत्यादी कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला या कार्यक्रमाला चटप साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकरीच्या माला दाम नाही सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही जिवती तालुक्याच्या विकास नाही असे म्हणून भाजप शिवसेना युतीवर सडकून टीका केली यंदाच्या २०१९ च्या विधानसभा क्षेत्रातून भाजप शिवसेना युतीच्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा आमदारकीचा उमेदवाराला हद्दपार करा आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे कायापालट करायचे असेल तर मला आमदार म्हणून विधानसभेवर पाठवा असे आवाहन अॅड.वामनराव चटप माजी आमदार यांनी केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.माधव पांचाळ यांनी केले, प्रस्तावना सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाप्रमुख शेतकरी संघटना यांनी केली, आभार प्रदर्शन श्रीपती सोडणर तालुकाप्रमुख युवा आघाडी शेतकरी संघटना यांनी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!