सिंदेवाही तहसीलदारास दिव्यांगांचे निवेदन

सिंदेवाही तहसीलदारास दिव्यांगांचे निवेदन

सिंदेवाही (प्रशांत गेडाम)  

सिंदेवाही तहसीलदार कुंभरे यांना अपंग विकास बहुद्देशीय संस्था यांच्या कडून    दि.२१/०२/२०१९ ला निवेदन दिले , त्या निवेदनात असे म्हटले आहे . की, 

मा. बालाजी  मंजुळे आयुक्त अपंग कल्याण  विभाग यांची बदली राज्य शासनाने जिल्हाधिकारी नंदुरबार येथे केल्यामुळे राज्यातील सर्व अपंग ,अपंग संघटना , विविध पक्षाची अपंग सेना,  अपंग विभाग , दिव्यांग सेना ,अपंग संस्था , प्रतिष्ठान संघर्ष समिती व इतर संघटनांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरावर तालुकास्तरावरील निवेदनाद्वारे विरोध दर्शवून वा प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन मा. बालाजी मंजुळे साहेब आयुक्त अपंग कल्याण विभाग यांची झालेली बदली स्थगिती करावे .

यासाठी  सिंदेवाही तालुक्यातील समस्त अपंग बंधू-भगिनी द्वारे तहसील कार्यालय सिंदेवाही समोर बदली स्थगित न झाल्यास धरणे ,निदर्शने, मोर्चे द्वारे, आंदोलन करण्यात येईल.

 अशा प्रकारचे निवेदन दिले निवेदन देतांना नितीन भाऊ रामटेके अपंग विकास बहुद्देशिया संस्था सिंदेवाही गुरुदास भरडकर उपाध्यक्ष  , 

युनुस शेख नगरसेवक नगरपंचायत सिंदेवाही , भगवंत पोपटे, प्रनय हरिदास गोपाळे , आनंद बोरकर पोलीस पाटील हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!