काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश
काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश
जिवती (शब्बीर जागीरदार)
जिवती तालुक्यातील घनपटार येथे दिनांक, २३ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आठ वाजता शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. वामनराव चटप माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र हे उपस्थित होते, प्रमुख पाहुणे प्रभाकरराव दिवे नागपूर विभागीय उपाध्यक्ष शेतकरी संघटना, सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाप्रमुख शेतकरी संघटना, देविदास वारे तालुकाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष, नरसिंग हामणे समन्वय प्रसिद्धी प्रमुख शेतकरी संघटना, नारायण माने विदर्भ राज्य आघाडी चे तालुकाध्यक्ष, शेषराव खंदारे ज्येष्ठ कार्यकर्ते, उपस्थित होते या बैठकीत , काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांनी अॅड. वामनराव चटप साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून साहेबराव कोळेकर, दत्ता आडे, विठ्ठल देवकते, मगरधवज देवकते, दत्ता धुळगुंडे, सुभाष कवळे, गजानन पोले, सदशिव गडदे, भगवान सलगर, उत्तम पोले, बालाजी धुळगुंडे, गंपू देवकते, श्रीरंग कोळेकर, रामा देवकते, संभाजी सुरनर, अंकुश कावळे, इत्यादी कार्यकर्त्यांनी लाल बिल्ला लावून शेतकरी संघटनेत प्रवेश केला या बैठकीत कार्यकर्त्यांना अॅड.वामनराव चटप, प्रभाकरराव दिवे, नारायण माने यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन नरसिंग हामणे , प्रस्तावना सय्यद शब्बीर जागीरदार, आभार देविदास वारे यांनी व्यक्त केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!