हळदा परिसरात वाघाची दहशत- ८ वर्षीय बालीका जखमी
पुन्हा एकदा वाघाच्या हल्यात 9 वर्षीय बालिका गंभीर जखमी
ब्रम्हपुरी :- मौजा जीचगाव ता ब्रम्हपुरी येथील श्री अरविंद मेश्राम यांची 9 वर्षाची मुलगी कु.सोनी मेश्राम हि आपल्या स्वतःच्या अंगणात आज दि 24/2/2019 ला सायंकाळी 6 :30 वाजता खेळत असताना तिच्यावर अचानक पने नरभक्षक वाघाने हल्ला चढविला मुलीने वाघाला पाहून जिवाच्या आकांताने आरडा ओरड केली त्यामुळे मुलीचे आई वडील व परिसरातील लोक धावून आले,व सर्वांनि वाघाला हाकलून लावले त्यामुळे वाघ मुलीला गंभिर अवस्थेत सोडून पळून गेला त्या नंतर लगेच त्या मुलीला आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्या मुलीला वाघाने तिच्या मानेला पकडून तिच्या छातीवर व पाटीवर ओरबडले.
हि बातमी कळताच किसान नेते कॉ विनोद झोडगे हे आपल्या कार्यकर्त्यासह आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात पोहचले व मुलीच्या तबेती ची चौकशी करून डॉक्टरांची विचारपूस केली तसेच तातडीने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून दवाखाण्यात बोलावून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास सांगितले. तदनंतर मुलीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी तिला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कॉम्रेड विनोद झोडगे ह्यांनी मुलीला गडचिरोली येथे पुढील उपचारासाठी पाठवून दिले.
यापूर्वी पद्मापुर येथील अनिता मोरेश्वर गेडाम ह्या महिलेचा नरभक्षी वाघाने बळी घेतलेला होता. पण अजूनही वन विभाग पाहिजे तेवढे लक्ष ह्या प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी देत नाही व अजूनही त्यांनी काहीही उपाय योजना केलेल्या नाही. हि खेदाची बाब आहे. परिसरातील जनता हि वाघाच्या दहशतीत जगत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!